पीएफच्या तीन वर्षांच्या स्लीपांचे शिक्षकांना वाटपपीएफच्या तीन वर्षांच्या स्लीपांचे शिक्षकांना वाटपपीएफच्या तीन वर्षांच्या स्लीपांचे शिक्षकांना वाटप

Last Updated on December 6, 2022 by Jyoti S.

जिल्ह्यातील २५८ खासगी प्राथमिक शाळा

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळेतील २५८ शाळांचे १,७०५ कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह, डीसीपीएस खात्यांचे २०१८ / १९ पासून २०२१ पर्यंतच्या हिशोबांच्या स्लिपा (चिठ्यांचे वाटप नाशिक जिल्हा वेतन पथक अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

शिक्षण विभागातील वेतन पथक आणि खासगी प्राथमिक महासंघाच्या संयुक्त विद्यमाने सीएमसीएस महाविद्यालयात मागील आठवड्यात विशेष शिबिराच्या माध्यमातून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या डीसीपीएस संदर्भातील विविध अडचणींवर तोडगा काढून प्रतीक्षेतील शिक्षक-शिक्षकेतरांना त्यांच्या भविष्य निर्वाह, डीसीपीएस खात्यांचे हिशोब देऊन चिठ्यांचे वाटप करण्यात आले.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, खासगी प्राथमिक महासंघाकडून शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वेळ मिळणे आवश्यक असून, त्यासाठी शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करण्याची मागणी करण्यात आली. सध्या शिक्षकांना बीएलओ रॅली अन्य स्पर्धा, विविध सर्व्हे यातून शिक्षकांना पुरेसा मिळत नसल्याने, अन्य शिक्षणेत्तर कामातून शिक्षकांना मुक्त करण्याची मागणीही यावेळी उपस्थित शिक्षकांनी केली.

भविष्य निधीच्या स्लिप यापुढे मोबाइलवर

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निधीच्या स्लिप व अन्य माहिती २०२२-२३ पासून मोबाइलवर बघता येणार आहे, तसेच वेतन पथक अधीक्षक यांनी शिक्षकांचे पगार १ तारखेला होण्यासाठी कटिबद्धता व्यक्त करतानाच, शाळेतील मुख्याध्यापक लिपिक यांनी कार्यालयातील सूचनांचे पालन करून वेळेवर पगार बिल सादर करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.