Last Updated on May 19, 2023 by Jyoti S.
RBI on 2000 Note : 2000 रुपयांची नोट आता बंद होणार आहे. आरबीआयने यासंदर्भात निर्णय घेतला आहे. या नोटा ३० सप्टेंबरपर्यंतच वैध असतील.
2000 ची नोट(RBI on 2000 Note) : भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. RBI ने 2000 च्या नोटा बाजारातून काढून घेण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, आरबीआयने 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येतील असे म्हटले आहे. तसेच तेव्हा 2018-19 मध्येच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आलेली होती. तसेच आता 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांना चार महिन्यांचा कालावधी दिलेला आहे.(RBI on 2000 Note)
हेही वाचा:
Todays weather : मान्सून उशिरा दाखल होईल, असा अंदाज ‘स्कायमेट’ संस्थेने वर्तवला आहे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद केल्याची मोठी घोषणा केलेली आहे. मात्र, सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या 2,000 रुपयांच्या नोटा व्यवहारासाठी वापरता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत वैध असतील. तोपर्यंत ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा(exchange 2000 note) आहेत त्यांना बँकेतून नोटा बदलून घ्याव्या लागतील.
नोटा कधी बदलता येतील?
RBI ने 2000 रुपयांच्या नोटा असलेल्या नागरिकांना बँकांमधून नोटा बदलून घेण्याचा सल्ला दिला आहे.2000 रुपयांची ही नोट बदलण्याची प्रक्रिया आता ह्या महिन्यापासून म्हणजेच 23 मे पासून सर्व बँकांमध्ये सुरू होणार आहे. 30 सप्टेंबरपर्यंत आता सर्व नागरिकांना नोटा बदलून घेता येणार असल्याची मोठी माहिती आरबीआयने नागरिकांना दिलेली आहे.(RBI on 2000 Note)
एका वेळी किती नोटा बदलल्या जाऊ शकतात?
तुम्ही एकावेळी फक्त 2000 रुपयांच्या नोटा 2000 रुपयांपर्यंतच बदलू शकता अशी अट घातली आहे . यासाठी बँकांना विशेष खिडकी उघडावी लागणार आहे.नोव्हेंबर 2016 मध्येच या नोटाबंदीनंतर(RBI on 2000 Note) आता संपूर्ण 2000 हजार रुपयांची नोट हि सर्वांच्या चलनामध्ये आलेली होती . नोटाबंदीमध्ये आता 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा ह्या बंद करण्यात आलेल्या होत्या.(rules for 200 note exchange)
गेल्या तीन वर्षांमध्ये कुठेच 2000 रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नाही.
2016-17 या आर्थिक वर्षामध्ये 2000 रुपयांच्या 35429.91 कोटी नोटा छापण्यात देखील आलेल्या होत्या . यानंतर 2017-18 मध्ये फारच कमी 1115.07 कोटी नोटा छापल्या गेल्या आणि 2018-19 मध्ये फक्त 466.90 कोटी नोटा छापल्या गेल्या. 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन आर्थिक वर्षांत 2000 रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नाही.
हेही वाचा:
technology news : तुमचा मोबाइल चोरीला गेलाय? आता चिंता करू नका; केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘या’ पोर्टलच्या मदतीने ट्रॅक करता येणार
2000 रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण वाढले आहे
Comments 3