Last Updated on December 17, 2022 by Jyoti S.
Cheap Bike: फक्त 20 हजार रुपयांत खरेदी करा ‘ही’ बाईक, वाचा जबरदस्त ऑफर..
बाईक(Cheap Bike) म्हणजे सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं. आजकाल काही लोक नवीन बाईक घेतात तर काही लोक हि सेकंड हँड बाईक घेतात. जर तुम्हालाही बाईक घ्यायची असेल पण तुमचं बजेट कमी असेल तर आज आम्ही तुम्हाला एक बेस्ट ऑफर सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही सेकंड हँड बाईक खरेदी करू शकणार आहात.
मार्केटमध्ये हीरो सुपर स्प्लेंडर प्लस बाईक आहे जी शानदार मायलेज देते. ही शोरूम बाईक खरेदी करताना जवळपास तुम्हाला 77 हजार रुपये खर्च करावे लागतात. पण एका ऑफरद्वारे तुम्ही ही बाईक फक्त 20 हजार रुपयांच्या बजेटमध्ये सेकंड हँड विकत घेऊ शकता. जाणून घ्या खास ऑफरबद्दल.
OLX: ओएलएक्स या वेबसाईटवरुन तुम्ही 2012 चं मॉडेल फक्त 20 हजार रुपयांत खरेदी करू शकता. दिल्लीत रजिस्टर करण्यात आलेलं हे मॉडेल आहे. ह्या बाइकवर तुम्हाला कुठल्याच प्रकारचा फायनान्स प्लॅनचा पर्याय मिळणार नाही.

DROOM: सेकंड हँड स्प्लेंडर प्लस बाईक ड्रूम या बेस्ट वेबसाईटवर उपलब्ध आहे. येथून तुम्ही दिल्लीमध्ये रजिस्टर असलेली 2014 ची बाईक केवळ 25 हजार रुपयांत खरेदी करू शकणार आहात. या वेबसाईटवर तुम्हाला फायनान्स प्लॅनचा पर्याय मिळेल म्हणजे तुम्ही हप्त्यावर ही बाईक खरेदी करू शकता. हेही वाचा :अबब!!!!!!! 20 कोटीची महागडी गाडी तुम्ही बघितली का?

QUIKR: क्विकर या वेबसाईटवरुन तुम्ही 2015 चं दिल्लीत रजिस्टर केलेलं मॉडेल 30 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. जर तुम्ही ही बाईक खरेदी केली तर तुम्हाला फायनान्स प्लॅनचा ऑप्शन मिळणार नाही. म्हणून एकदाच पूर्ण रक्कम भरून तुम्हाला ही बाईक खरेदी करावी लागेल.

(नमूद ऑफर्सबद्दल खात्री करा आणि मगच बाईक खरेदी करा.)