Last Updated on December 16, 2022 by Jyoti S.
compensation for damages : सरकारचा मोठा निर्णय.
अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान (compensation for damages)झालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता आपल्या राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

किती भरपाई मिळणार..?
जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी (compensation for damages) 6800 रुपयांऐवजी, आता 13,600 रुपये, तर बागायती पिकांच्या नुकसानीसाठी 13,500 रुपयांऐवजी आता 27 हजार रुपये भरपाई मिळणार आहे. महसूल तसेच वन विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे.Schemes of State Govt: आता विहीर दुरुस्तीसाठी हि मिळणार 50 हजार रुपये, जाणून घ्या या राज्य सरकारच्या योजनेबाबत!!
बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी आता 18 हजार ऐवजी 36 हजार रुपये भरपाई मिळेल. शिवाय आता , राज्य सरकारने नुकसानीची मर्यादा सुद्धा वाढवली आहे. आता दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.