डिजिटल चलनामुळे दर्शनी चलनाचा अनादर

Last Updated on December 6, 2022 by Jyoti S.

आरबीआयच्या वचनाचा अनादर : चिल्लरसह नोटांना सगळ्यांचाच नकार

नाशिक : अर्थखात्याने शासकीय आदेशानुसार केवळ २५ पैसे बाद ठरविले असताना ५० पैसे तर सोडाच आता एक, दोन रुपयांसह पाच रुपयांच्या नोटा आणि चिल्लरचे बाजारात अवमुल्यन होत आहे. या चलनाला बाजारात नाकारण्यात येत असून रिझव्हं बँकेच्या गव्हर्नर यांनी दिलेल्या वचनाचाच एक प्रकारे अनादर केला जातो आहे. शासनाकडून तशा कोणत्याही सूचना नसताना या चलनाचा आदर करण्यासंदर्भात शासनाकडून कोणतेही आदेश येत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

कोणत्याही प्रकारचे चलन बाजारात आणताना त्याचे मुल्य रिझर्व्ह बँकेकडून पक्के केले जाते. चलनावर त्या प्रकारची प्रॉमिसरी नोट अर्थात वचनपत्र दिले जाते. कालौघात सुटे पैसे नामशेष होत असताना शासनाने २५ पैशांपर्यंत सर्व चलन बाद केले. त्यापुढील रकमेची चिल्लर आणि नोटा बाजारात चलनक्षम असतानाही आता बाजारात ५० पैसे तर बादच झाले आहेत, मात्र एक रुपयाचा डॉलर, दोन रुपये तसेच पाच रुपयांपर्यंतच्या नोटा स्विकारण्यास सर्वच स्तरातून नकार मिळू लागला आहे. डिजिटल मनीमुळे सुटे पैसे देण्याची गरज भासत नसून ते थेट खात्यात जमा होत आहेत. बँकामध्ये त्य ग्राहकांना सुटे पैसे देण्याची गरज नसल्याने दुकानदारही सुटे पैसे नाकारत आहेत. त्यामुळे एकप्रकारें पैशाचा अनादर होत असल्याची भावना व्यक्त होते आहे.

Comments are closed.