Electric bullet : फक्त 2 हजारांत घरी न्या ‘इलेक्ट्रिक बुलेट’, एका चार्जमध्ये धावणार 150 किमी…

Last Updated on December 20, 2022 by Jyoti S.

Electric bullet: फक्त 2 हजारांत घरी न्या ‘इलेक्ट्रिक बुलेट’, एका चार्जमध्ये धावणार 150 किमी…

गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्राॅनिक गाड्यांना मागणी वाढलीय. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक बाईक्सना पसंती मिळताना दिसत आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन, अनेक दिग्गज कंपन्या इलेक्ट्रिक बाईक बाजारात आणत आहेत. आता त्यात आणखी एका बाईकची भर पडलीय.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

‘सिल्वेलाईन’ (Silveline) नावाची बिहारची एक कंपनी आहे. या कंपनीने ‘रॉयल एनफिल्ड बुलेट’चे इलेक्ट्रिक(Electric bullet) व्हर्जन तयार केलंय. बुलेटसारखीच ‘सेम टू सेम’ दिसणाऱ्या या बाईकला कंपनीने ‘लव्ह प्लस’ असं नाव दिलंय. ही कंपनी आपल्या वेबसाइट्सवर ही बाईक विकत असून, तेथे इतरही इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्कूटर्सचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत.हेही वाचा: Cheap Bike: फक्त 20 हजार रुपयांत खरेदी करा ‘ही’ बाईक, वाचा जबरदस्त ऑफर..

बाईकची वैशिष्ट्ये

सिल्वेलाईन’च्या इलेक्ट्रिक बाईकला(Electric bullet) 72V/48AH ची बॅटरी देण्यात आली आहे.
बाईकचा टॉप स्पीड 120 किलोमीटर प्रति तास आहे.
एकदा ही बाईक फुल चार्ज केल्यास 150 किमीपर्यंत धावत असल्याचा कंपनीचा दावा आहे.
केवळ 2000 रुपयांत ही बाईक बूक करता येते.
किंमत – 1,51,999 रुपये

‘सिल्वेलाईन’च्या वेबसाईटवर बुलेटसारखी(Electric bullet) दिसणारी ही बाईकच नव्हे, तर अगदी ‘पॅशन प्रो’, ‘यामाहा-R15’देखील इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये खरेदी करता येते. इलेक्ट्रिक ऑटो आणि ई-रिक्शादेखील येथे उपलब्ध आहे. कंपनीचे सर्वात स्वस्त मॉडेल 56 हजार रुपयांचे असून, ही एक स्लो स्पीड मोपेड आहे. एका चार्जवर ही मोपेड 70 किमीपर्यंत चालते. ही फुल चार्ज होण्यासाठी 2 ते 3 तास लागतात.