Electricity bill can also be paid in grocery:किराणा, मेडिकल दुकानातही भरता येणार वीजबिल ! वीजबिल वसुलीसाठी महावितरणची नवी उपाययोजना

Last Updated on July 24, 2023 by Jyoti Shinde

Electricity bill can also be paid in grocery

नाशिक : ग्राहकांना वेळेवर वीज बिल भरता यावे आणि त्या माध्यमातून अधिकची थकबाकी राहू नये यासाठी महावितरणकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणुन आता ग्राहकांना आपल्याजवळच्या किराणा आणि मेडिकल दुकानात जाऊन वीज बिल भरता येणार आहे.

वीज बिल भरण्याची सुविधा व्हावी यासाठी महावितरणचे बिल भरणा केंद्रे आहेतच, परंतु ऑनलाइन वीज बिल भरण्याबाबत प्रोत्साहन दिले जात आहे. आता किराणा दुकानातच वीज बिल भरण्याबाबतची नवी योजना सुरू करण्यात येणार आहे.

ग्राहकांकडे अनेक कारणांमुळे वीज बिल थकीत राहते आणि मग वसुलीसाठी महावितरणाला पाठपुरावा करावा लागतो. त्यातूनही पुरेसी वसुली होत नसल्याने महावितरणने ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठीची जास्तीत जास्त सुविधा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ऑनलाइन, गो-ग्रीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. आता किराणा दुकानातून वीज बिल भरण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.Electricity bill can also be paid in grocery

पेमेंट वॉलेटसाठी अर्ज करावा लागणार

एखाद्या दुकानदाराला वीज बिल तर त्यांना डिजिटल पेमेंट वॉलेट घ्यावे लागणार आहे. यासाठी त्याला महावितरणकडे अर्ज सादर करावा लागणार आहे. दुकानदाराला या वॉलेटमध्ये पैसेही जमा करावे लागतील.

कागदपत्रे काय लागणार?

आधार कार्ड, पॅन कार्ड, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, शॉप अॅक्ट लायसन, रहिवासी दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि रद्द केलेला धनादेश या कागदपत्रांचा समावेश राहणार आहे.Electricity bill can also be paid in grocery

अर्ज, जागेच्या पडताळणीनंतर मिळणार मंजुरी ज्या किराणा किवा मेडिकल दुकानदारांनी डिजिटल पेमेंट वॉलेटसाठी अर्ज केला असेल त्यांचा अर्ज पडताळणी केल्यानंतर आणि त्याच्या दुकानाची जागा पडताळणी केल्यानंतर हे डिजिटल पेमेंट वॉलेट उपलब्ध होणार आहे. या वॉलेटमध्ये सुरुवातीला किमान पाच हजार रुपयांची रक्कम भरावी लागणार.

हेही वाचा: Indian UPI Payment Become Global: भारताचा UPI जगात प्रचंड भारी! भारताच्या ऑनलाइन पेमेंट प्रणालीचे जगभरात कौतुक