Last Updated on March 29, 2023 by Jyoti S.
electricity bill : शेतकऱ्यांसाठी आता खूप मोठी संधी
थोडंस पण महत्वाचं
Nashik : गेल्या काही दिवसांपासून महावितरण आणि शेतकऱ्यांमध्ये खूपच वाद सुरू आहे. सध्या महावितरणकडे मोठी थकबाकी आहे. त्यातच पुणे विभागातील कृषी पंप वीज ग्राहकांची थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे.
त्यामुळे महावितरणकडून(electricity bill) अनेक योजना शेतकऱ्यांसमोर ठेवल्या जात आहेत. यामध्ये राज्य सरकारने थकबाकी वसुलीसाठी नवीन कृषी पंप धोरण 2020 तयार केले आहे. याद्वारे 31 मार्च 2023 पर्यंत थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना 30 टक्के सूट दिली जाईल.
शेतकऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. यासोबतच विलंबाची रक्कम आणि व्याज माफ करण्यात येत आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आताच पैसे भरावेत, असे मोठे आवाहन करण्यात आले आहे. पुणे प्रादेशिक मंडळाचे (महावितरण) संचालक अंकुश नाळे यांनी ही माहिती दिली.
हेही वाचा: पुढील 3 दिवस या 10 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, हवामान खात्याने जारी केला अलर्ट
डिसेंबर 2022 अखेर महावितरण पुणे प्रादेशिक विभागातील कृषी पंप वीज ग्राहकांची थकबाकी 12 हजार 61 कोटी झाली आहे. जानेवारी 2021 ते मार्च 2022 पर्यंत सगळ्यांना 50 टक्के सूट देण्यात आली होती.
हेही वाचा: पेट्रोलचे दर स्तिर परंतु डिझेलच्या दरामध्ये वाढ.पहा आजचे दर काय
परंतु आता एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत या योजनेवर 30 च टक्के सूट दिली जाईल. उशीरा रक्कम आणि व्याज पूर्णपणे माफ केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा महावितरणचा प्रयत्न आहे.