
Last Updated on September 27, 2023 by Jyoti Shinde
Electricity news update
प्रादेशिक परिवहन कार्यालयात १३ हजार २०९ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी
Nashik: पर्यावरणाला हानी पोहोचू नये तसेच वाढते प्रदूषण रोखण्यासाठी शासनाने सर्वच इलेक्ट्रिक वाहने वापर करणाऱ्या वाहनधारकांना रस्ते करात सवलत दिलेली असल्याने इलेक्ट्रिक वाहन संख्या वाढली आहे.
नाशिक जिल्ह्यात दुचाकी, मोपेड, मोटार कार आदी रिक्षा, गुडस कॅरिअर तीनचाकी प्रवासी रिक्षा अशा विविध जवळपास १३ हजार २०९ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयात करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे वीज महागल्याने इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्यासाठी ज्यादा वीज बिल इलेक्ट्रिक वाहने वापरणाऱ्यांच्या माथी पडत आहे.Electricity news update
हेही वाचा :Todays Weather: मान्सून जोरदार बरसणार! राज्यात या भागात मुसळधार पाऊस, हवामान खात्याची माहिती.
इलेक्ट्रिक वाहन प्रदूषण रोखण्यासाठी मोठी मदत करते
वाढते प्रदूषण रोखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने वापर वाढवा, असे शासनाचे धोरण आहे. शासनाने इलेक्ट्रिक वाहने वापर करणाया वाहनधारकांना करात सवलत दिलेली आहे, त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा तसेच वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
जिल्ह्यात १३ हजार इलेक्ट्रिक वाहने
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार २०९ इलेक्ट्रिक वाहनांची नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करण्यात आलेली आहे. लेक्ट्रॉनिक वाहनात दुचाकी, चारचाकीमोपेडतीन चाकी प्रवासी, तीन चाकी मालवाहू वाहनांचा समावेश आहे.Electricity news update
जिल्ह्यात एकही चार्जिंग स्टेशन नाही
पर्यावरणाचे रक्षण व्हावे, वाढत्या प्रदूषणाला आळा बसावा, यासाठी शासनाने इलेक्ट्रिक वाहने वापरण्यावर अधिक भर द्यावा, अशी जनजागृती केली आहे. शासनाने इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचे आवाहन केले असले तरी दुसरीकडे मात्र शासनामार्फत इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग करण्यासाठी जिल्हाभरात अद्याप एकही जबिल चार्जिंग स्टेशन नाही. परिणामी, इलेक्ट्रिक वाहने वापरणाच्या नागरिकांना घरातल्या विजेचा वापर करून वाहने चार्जिंग करावी लागतात.Electricity news update
हेही वाचा: Specializing In Mental Health: ‘या’ कारणांमुळे मुलं होत आहेत ऐकलं कुंडी!