Last Updated on March 29, 2023 by Jyoti S.
Free Ration
थोडं पण महत्वाचं
Free Ration : मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता सरकार शिधापत्रिकाधारकांना सामान्य तांदळाऐवजी वेगळा पदार्थ देणार आहे.
मोफत रेशन अपडेट(Free Ration) : देशातील गरीब नागरिकांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने रेशन कार्ड योजना सुरू केली आहे. या अंतर्गत सरकार शिधापत्रिकाधारकांना कमी दरात गहू, तांदूळ व इतर वस्तूंचे वाटप करते.
हेही वाचा: New rules for LPG gas cylinders : गॅस सिलिंडर धारकांसाठी आनंदाची बातमी, 25 मार्चपासून लागू होणार नवीन नियम
तसेच, कोरोनाच्या काळात देशव्यापी लॉकडाऊनमुळे नागरिकांना खाणे पिणे कठीण झाले होते. गरीब नागरिकांचे उत्पन्नाचे साधन बंद झाल्याने केंद्र सरकारने मोफत रेशन देण्याचा निर्णय घेतला. यासोबतच 2024 पर्यंत देशातील शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य वाटप करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आता उत्तराखंड सक्करच्या रेशनबाबत आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे. शिधापत्रिकेचे नियम बदलले आहेत. रेशनच्या माध्यमातून मिळणाऱ्या साहित्यात सरकार बदल करणार आहे.