
Last Updated on September 9, 2023 by Jyoti Shinde
GST Council 50th Meet Decisions
GST Council Meet: GST परिषदेच्या बैठकीत ऑनलाइन गेमिंग(Online Gaming) GST अंतर्गत आणणे, 28 टक्के कर लावणे आणि कर्करोगाच्या औषधांवरून IGST काढून टाकणे असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
GST Council Meet: जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची मंगळवारी घोषणा करण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ऑनलाईन गेमिंगला GST अंतर्गत आणणे, 28 टक्के कर लावणे आणि कर्करोगाच्या औषधांवरून IGST काढून टाकणे असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. जाणून घेऊया कोणत्या वस्तूंमध्ये मिळणार आराम आणि कोणत्या महाग होणार?GST Council 50th Meet Decisions
ऑनलाइन गेमिंगवर कर(GST)
GST कौन्सिलच्या बैठकीत ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग, कॅसिनोच्या संपूर्ण किमतींवर 28% GST लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाईन गेमिंगला ह्याला जीएसटी कायद्याच्या कक्षेमध्ये आणण्यात आलेला आहे. ऑनलाइन गेमिंगवर जीएसटी लावण्याच्या निर्णयाचे स्पष्टीकरण देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, या विषयावर सविस्तर चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. चर्चेदरम्यान, ऑनलाइन गेमिंग उद्योग आज किती प्रभावशाली आहे आणि त्यातून किती कमाई होऊ शकते. या सर्व मुद्द्यांवर प्रत्येक राज्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा: shaskiy valu vikri yojna : आता 50 टनांपर्यंत वाळू 133 रुपये प्रतिटन दराने मिळणार.
गाड्या खरेदी कारण महागणार!
जीएसटी कौन्सिलच्या बैठकीतील निर्णयामुळे कार खरेदी करणे अधिक महाग होणार आहे. ज्या कारची लांबी 4 मीटरपेक्षा जास्त आहे, इंजिन क्षमता 1500 सीसी पेक्षा जास्त आणि ग्राउंड क्लीयरन्स 170 एमएमपेक्षा जास्त आहे, त्यांना 22 टक्के कंपनसेशन सेस (Compensation Cess) लागू होईल. सेडान कार्सना यातून वगळण्यात आले आहेत.GST Council 50th Meet Decisions
आयात केलेले कर्करोग औषध स्वस्त
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतलेल्या इतर महत्त्वाच्या निर्णयांबद्दल बोलताना, आयात केलेल्या कर्करोगाच्या औषधांवर यापुढे IGST लादला जाणार नाही. म्हणजेच हे औषध स्वस्त होणार आहे. जीएसटी(GST) कौन्सिलच्या या बैठकीमध्ये आता कॅन्सरवरील सर्वच औषध डिनुटक्सिमॅबची(dinutuximab) आयात हि चांगलीच स्वस्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. त्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्याच वेळी, सध्या त्यावर 12 टक्के IGST आकारला जातो, जो परिषदेने शून्यावर आणला आहे. ह्या कर्करोग वरील आजारांच्या औषधाच्या एका डोसची किंमत हि 63 लाख रुपये इतकी आहे.
चित्रपटगृहांमध्ये अन्न स्वस्त मिळणार
सिनेमागृहात गेल्यावर प्रत्येकाची एकच तक्रार असते आणि ती म्हणजे थिएटरमध्ये मिळणारे जेवण. आतापासून खाणेपिणे स्वस्त होणार आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना महसूल सचिव संजय मल्होत्रा म्हणाले की, सिनेमागृहांमधील खाण्यापिण्यावरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीपूर्वी सिनेमागृहांमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थ आणि शीतपेयेवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला सुद्धा परिषदेच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे.GST Council 50th Meet Decisions
हेही वाचा: Mumbai Nashik Highway Rules : मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी
हे पदार्थ झाले स्वस्त
आता जीएसटी कौन्सिलच्या या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन(Nirmala sitaraman) यांनी या सर्व वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याची घोषणा केलेली आहे. यामध्ये कच्च्या मालावरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच आता कच्च्या किंवा न तळलेल्या वस्तू सगळ्याच स्वस्त झालेल्या आहेत. याशिवाय इमिटेशन जरी यार्नवरील कर १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे.