
Last Updated on June 6, 2023 by Jyoti Shinde
How To Open Petrol Pump
पेट्रोल पंप कसा उघडायचा(How To Open Petrol Pump) : पेट्रोल आणि डिझेलची वाढती मागणी पाहता आजकाल प्रत्येक लहान-मोठ्या गावात आणि शहरात नवीन पेट्रोल पंप सुरू होत आहेत.
पेट्रोल पंप कसा उघडावा: देशात सर्वत्र पेट्रोल आणि डिझेलसारख्या(How To Open Petrol Pump) इंधनाची मागणी नेहमीच खूप मोठी असते.त्याचमुळे तुम्हालाही नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आता तुम्ही सुद्धा पेट्रोल पंप सहज रित्या उघडू शकता.
पेट्रोल पंप व्यवसायात तोटा होण्याची शक्यता फारच कमी आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत असल्याने त्याची मागणीही जास्त प्रमाणात वाढलेली आहे. पेट्रोल आणि डिझेलची वाढती मागणी लक्षात घेता, आजकाल प्रत्येक लहान गावात आणि शहरात नवीन पेट्रोल पंप सुरू होत आहेत.
म्हणजेच हा व्यवसाय आता सुरू करून तुम्ही महिन्याला भरपूर पैसे देखील कमवू शकता. पेट्रोल पंप उघडण्यासाठी आता तुमच्याकडे कोणत्याही मुख्य रस्त्यावर किमान 800 चौरस मीटर जागा असणे खूप महत्वाचं आहे.How To Open Petrol Pump
हायलाईट्स
पेट्रोल पंप उघडण्यासाठी तुम्ही या वयाचे असावे
जर तुम्हाला पेट्रोल पंप उघडायचा असेल तर आता तुमचे वय हे किमान २१ वर्षे असणे गरजेचे आहे .तसेच, पेट्रोल पंपासाठी अर्जदार हा मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास असावा. अर्जदाराला रिटेल आउटलेट, व्यवसाय किंवा इतर संबंधित क्षेत्र चालवण्याचा किमान 3 वर्षांचा चांगला अनुभव देखील असं गरजेचं आहे. विशेष म्हणजे त्या अर्जदाराचा कुठलाच गुन्हेगारी रेकॉर्ड नसावा.
या गोष्टी आवश्यक असतील
एक डिस्पेंसिंग युनिट उभारण्यासाठी 800 स्क्वेअर मीटर आणि दोन डिस्पेंसिंग युनिट्स उभारण्यासाठी 1200 स्क्वेअर मीटर जमीन आवश्यक आहे. पेट्रोल पंप व्यवसायाची किंमत आणि महसूल तसेच ही जमीन आता कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर वादांपासून मुक्त असणे हे खूपच गरजेचे आहे.How To Open Petrol Pump
जरी सुरुवातीला तुम्हाला पेट्रोल पंप उघडण्यासाठी खूप पैसे गुंतवावे लागतील, परंतु तुम्ही कमाई सुरू केल्यावर ते परत मिळवू शकता. तुम्ही पेट्रोल पंप सुरू केल्यानंतर तुम्हाला किमान 8-10 लाख रुपये आधी गुंतवावे लागनार आहे . जेव्हा तुम्ही तुमच्या पेट्रोल पंपावर इंधनाची विक्री सुरू करता तेव्हा तुम्ही दरवर्षी तेवढीच रक्कम सहज वाचवू शकता.