
Last Updated on June 8, 2023 by Jyoti Shinde
HSC exam
HSC exam : आता केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. अंतिम मुदत 31 ऑक्टोबर आहे.
नागपूर : केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी आता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. अंतिम मुदत 31 ऑक्टोबर आहे. जर विद्यार्थी 12वी उत्तीर्ण होऊन पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेत असतील तर त्यांना 10 हजार ते 20 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळण्याची संधी आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ५० हजारांपर्यंत शिष्यवृत्ती मिळेल. यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल.HSC exam
अर्जदाराचे वय हे 18 ते 25 वर्षे या दरम्यानच असावे लागणार आहे . SC ला 15%, ST ला 7.5%, OBC 27% आणि PWD ला 5% शिष्यवृत्ती मिळेल.
अर्ज करण्यासाठी शिष्यवृत्ती वेबसाइटला भेट द्या. यानंतर उच्च शिक्षण विभागावर क्लिक करा. त्यानंतर कॉलेज आणि युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय क्षेत्र योजना शिष्यवृत्तीवर क्लिक करा. शिष्यवृत्तीबद्दल सर्व माहिती येथे आढळू शकते. HSC exam
त्यानंतर होम पेजवर नवीन नोंदणीवर क्लिक करा आणि जर तुम्ही आधीच नोंदणी केली असेल तर तुम्ही लॉगिन करून अर्ज भरू शकता. तसेच शिष्यवृत्ती मिळालेले विद्यार्थी सुद्धा यासाठी आपले अर्ज करू शकतात. त्या विद्यार्थ्यांना मागील वर्षी या विषयामध्ये किमान ६० टक्के गुण मिळालेले असावेत.