लहानपणापासूनच आर्थिक साक्षरता अंगिकारण्याचे महत्त्व!

Last Updated on November 21, 2022 by Taluka Post

सरकारने सांगितलेल्या आकडेवारीनुसार भारतातील लोकांचे सरासरी वय २९ वर्षे आहे. ज्यामुळे आपला देश जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक बनला आहे. तंत्रज्ञानामध्ये आविष्कार घडवून आणण्यासोबत ऑटोमेशनचे उत्पादन, इंटरनेट-आधारित सेवा यामध्ये कुशल असलेले डिजिटल-केंद्रित, तरुण, श्रमजीवी व्यक्ती आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील, अशी अपेक्षा आहे. तरुण लोकसंख्येसंदर्भात भारताचा लोकसंख्या शास्त्रीय लाभांश आगामी वर्षांमध्ये विशिष्ट लाभ मिळवून देण्याचा अंदाज आहे. अशा स्थितीमध्ये आर्थिक साक्षरता तरुणांसाठी सर्वात लक्षणीय पैलू (तरीदेखील दुर्लक्ष करण्यात आलेला) बनला आहे. निश्चितच सक्रियपणे गुंतवणूक करणाऱ्या तरुण श्रमजीवी व्यावसायिकांमध्ये स्वागतार्ह बदल झाला आहे. पण मर्यादित पैसा, व्यवस्थापन ज्ञान असलेले व्यक्ती बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करणे आणि प्रत्येक अल्पकालीन बाजारपेठ व्यवहाराला किंवा वैयक्तिक पूर्वाग्रहाला प्रतिसाद देणे, ज्यामुळे परिणामी असमाधानकारक अनुभव मिळणे, अशा गोष्टी सामान्य झाल्या आहेत. आज पैसे व्यवस्थापन तरुणांसाठी प्रमुख चिंता बनली आहे. लोक त्यांचा बहुतांश प्रौढ काळ त्यांच्या फायनान्सबाबत चिंता करत व्यतित करतात. कारण ते पगार होईपर्यंत क्वचितच पैसे व्यवस्थापनाबाबत माहिती करून घेण्यास पुढाकार घेतात. तरुणपणीच पैसे व्यवस्थापन कसे करावे हे जाणून घेतल्याने व्यक्ती सद्यस्थितीचा सामना करण्यास उत्तम प्रकारे सुसज्ज असतील, आपण मुलांना संपत्ती व्यवस्थेपनामधील सक्रिय आर्थिक निर्णय घेण्यामध्ये का सामील केले पाहिजे, या मागील प्रमुख कारणे समजण्यास मदत होईल. वयाच्या सुरुवातीपासूनच आर्थिक साक्षरतेचे महत्त्व माहीत असण्यामागील काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

गरजा आणि इच्छा यातील फरक समजून घ्या :

प्रौढ म्हणून आपल्याला आपल्या गरजा (आवश्यकता) आणि इच्छा (इच्छा आणि आकांक्षा) यांच्यातील फरकाची जाणीव आहे. पण मुले गरजेचा चुकीचा अर्थ लावू शकतात. पैसे व्यवस्थापनाबाबत सांगत तुम्ही त्यांना कर्ज न घेता त्यांच्या गरजा आणि इच्छांचा समतोल कसा साधावा हे शिकवू शकता. आर्थिक व्यवस्थापनाची मुलभूत माहिती मुलांना त्यांच्या खर्चाचे नियोजन करण्यासाठी खूप मदत करेल. उदाहरणार्थ, सुट्टीवर गेलेला एक तरुण एक धोरणात्मक योजना तयार करू शकतो, ज्यामुळे त्याच्या खिशावर अधिक भार न पडता सुट्टीचा प मनमोकळेपणाने आनंद घेता येईल.

पैशाचे मूल्य जाणून घ्या :

पालक म्हणून कधी तरी तुम्ही कदाचित म्हटले असेल की ‘पैसा झाडावर उगवत नाही!’ (आणि आपल्यापैकी बहुतेकांनी हे आपल्या पालकांकडून ऐकले आहे!) पैशाचे मूल्य शिकणे हे आर्थिक साक्षरतेचे सर्वात स्पष्ट कारण वाटू शकते; पण त्याचे महत्त्व कालातीत आहे. लहानवयात जरी मुलांना गुंतागुंतीच्या आर्थिक संकल्पना समजू शकत नसल्या तरी, खेळणी खरेदी करणे, मैफिली, खेळ, उद्यानांना भेट देणे इत्यादींसारख्या सामाजिक अनुभवांमध्ये भाग घेणे यासारख्या दैनंदिन कृतींकरिता त्यांना प्राधान्य देण्यास आणि त्यांचे आर्थिक व्यवस्थापन करण्यास शिकवले पाहिजे. आर्थिक शिक्षण मुलांना विलंबित समाधान समजण्यास, त्यांच्या हक्काची भावना कमी करण्यास आणि जबाबदारी विकसित करण्यास मदत करू शकते.

क्रेडिट आणि कर्ज हाताळण्याचे महत्त्व दाखवा :

क्वचितच आपण आपल्या मुलांना चांगला क्रेडिट स्कोर असण्याचे महत्त्व समजावून सांगतो किंवा अनावश्यक कर्जापासून दूर राहण्याची गरज दाखवतो. याबाबत चर्चा होईपर्यंत ते कदाचित काही आर्थिक निर्णयांच्या जोखीमांचा सामना करतील, ज्याचा परिणाम एकतर खराब स्कोअरमध्ये होईल किंवा त्यांना काही प्रकारच्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. पण ही भूमिका बदलण्याची जबाबदारी पालक आणि शिक्षकांवर आहे. गेमिफिकेशनचा एक भाग म्हणून मुलांना फक्त या दोन संज्ञांमधील फरक शिकवण्यासाठीच नव्हे, तर अशा परिस्थितीतून मार्ग काढण्याबाबत माहिती उ दिल्याने निश्चितच मुलांना पैशाचे मूल्य त आणि अविचारी आर्थिक निर्णय घेण्याचे स परिणाम समजून घेण्यास मदत होईल.

डिजिटल ट्रस्टचे महत्त्व समजावून सांगा :

डिजिटल युगामुळे आर्थिक साक्षरतेसाठी नवीन संधी मिळाल्या असल्यातरी सोबतच आपल्याला अनेक जोखीमांसह असुरक्षित बनवले आहे. त्यामुळे ऑनलाइन घोटाळे टाळण्यासाठी मुलांना त्यांच्या खात्याची माहिती आणि पासवर्ड सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व शिकवणे अत्यावश्यक आहे. फैक्ट शीटसाठी प्रोत्साहित केल्यास मुले लहानपणापासूनच डिजिटल किंवा सोशल मीडियाच्या जगात उपलब्ध असलेल्या माहितीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये हे शिकतील. या व्यतिरिक्त त्यांना अनोळखी आणि संशयास्पद लिंक्स उघडण्याच्या धोक्याबद्दल चेतावणी द्या, जरी ते एखाद्या मित्राकडून आलेल्या असतील तरी. वास्तविक जगात स्मार्ट आणि जाणकार ग्राहक मानसिकता हा आर्थिक साक्षरतेचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे. मुलांना रिटर्न पॉलिसीवर ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी थोडे संशोधन करण्यास प्रवृत्त करा, किमतींची तुलना करत आणि ऑनलाइन पुनरावलोकन वाचत त्यांना योग्य आर्थिक निर्णय घेण्यास मदत करा..

लहानवयात आर्थिक साक्षरता आत्मसात करण्याचा मानक दृष्टिकोन नसला तरी, पालक आणि शिक्षकांना धमाल व सर्वसमावेशक पद्धतीने (शक्यतो गेमिफिकेशनद्वारे किंवा किटी तयार करून) प्रयोग करण्यास मुभा आहे, ज्यामुळे मुलांमध्ये अधिक सक्रिय रूची निर्माण होईल. पूर्वीच्या काळात माहिती क्वचितच उपलब्ध होती. पण आज लहान मुले, आणि प्रौढांना सर्व माहिती अगदी सहजपणे उपलब्ध होत आहे. तंत्रज्ञानाने गुंतवणूक करणे सोपे केले आहे. तुमच्या मुलाला डिजिटल फायनान्स संकल्पनेची ओळख करून देणे अत्यावश्यक बनले आहे. ज्यामुळे ते माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेऊ शकतील.

या लेखाचा शेवट करत असताना मला वॉरन बफे यांचे रोचक मत सांगावेसे वाटते. ते म्हणाले होते. ‘मी माझी पहिली गुंतवणूक वयाच्या ११व्या वर्षी केली. तोपर्यंत मी माझा वेळ वाया घालवत होतो.’ तरुण भारतीय या दिशेने सतत पुढाकार घेत असताना आर्थिक शिक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.राघव अय्यंगर, चीफ बिझनेस ऑफिसर, ऑक्सस एएमसी.

Comments are closed.