लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत वाढ

Last Updated on November 29, 2022 by Jyoti S.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गंत घडामोडीमुळे मागील काही वर्षांपासून सोन्याच्या मागणीला अवकळा आली होती. परिणामी, ग्राहकांच्या मागणीतदेखील घसरण झाली होती. एकेकाळी गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंती असलेल्या सोन्याची झळाळी कमी झाली होती. मात्र आता पुन्हा सोन्याच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. लग्नसराईमुळे देशभरातील सराफा बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या महिन्यात सोन्याच्या किमतींनी 53 हजारांची पातळी गाठली होती. डॉलर कमकुवत झाल्यामुळे सोन्याच्या दरात या महिन्यात तेजी नोंदवली गेली आहे.

भारतात लग्नसराईच्या निमित्ताने सोने-चांदीच्या दागिन्यांना मोठी मागणी असते सध्या लग्नसराईचा काळ सुरू झाल्याने सराफा बाजारांमध्ये सोन्याचा मागणीत वाढ झाली आहे. कोरोनापूर्व काळापासून सोन्याच्या मागणीत मोठी घसरण झाली. त्यात वाढ झाली नव्हती. कोरोना लग्नसराई तसेच गुंतवणुकीसाठी देखील ग्राहकांनी सोने खरेदीला प्राधान्य दिले नाही. मात्र आता ग्राहकांनी सुवर्णखरेदीला पुन्हा प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीत देखील सोन्याला चांगली मागणी आली. यंदाच्या दिवाळीच्या मोसमात सोने खरेदीने उच्चांक गाठला होता. कोरोनानंतर यंदाच्या लग्नसराईत सोन्याला चांगली मागणी आली आहे. या महिन्यात सोन्याच्या दरांनी 53 हजारांची पातळी गाठली आहे. सोन्याची सरासरी किंमत 52,446.8 रुपये प्रति तोळे नोंदवली गेली. तर दुसरीकडे एमसीएक्सवर चांदीच्या किमती 341 रुपये म्हणजेच 0.52 टक्क्यांनी घसरल्या होत्या आणि 61,335 रुपयांवर व्यवहार करत होत्या. चांदीची सरासरी किंमत 64,331.59 रुपये नोंदवली गेली. मागील व्यवहाराच्या सत्रात चांदी 61,676 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

आयात 17 टक्क्यांनी घसरली

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत (एप्रिल-ऑक्टोबर) देशातील सोन्याची आयात 17.38 टक्क्यांनी घसरून 24 अब्ज डॉलरवर आली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत सोन्याची आयात 29 अब्ज डॉलर्स होती. आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये सोन्याची आयात 27.47 टक्क्यांनी घसरून 3.7 अब्ज डॉलरवर आली आहे.

त्याचप्रमाणे ऑक्टोबरमध्ये चांदीची आयातही 34.80 टक्क्यांनी घसरून 58.5 कोटी डॉलर्स झाली आहे. तथापि, एप्रिल-ऑक्टोबरमध्ये चांदीची आयात वाढून 4.8 अब्ज डॉलर्स झाली आहे, गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीतील 1.52 अब्ज डॉलर्स होती. एप्रिल-ऑक्टोबर 2022 साठी अब्ज डॉलर्स होती, जी मागील वर्षी मालावरील व्यापार तूट 173.46 याच कालावधीत 94.16 अब्ज डॉलर्स होती. भारत हा जगातील होती.जगातील सर्वात मोठा सोन्याचा आयातदार देश म्हणून भारताला ओळखले जाते. देशांतर्गत दागिने उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रामुख्याने सोने आयात केले जाते. भारत दरवर्षी 800 ते 900 टन सोन्याची आयात करतो. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत हिरे आणि दागिन्यांची निर्यात 1.81 टक्क्यांनी किरकोळ वाढून 24 अब्ज डॉलर्स झाली आहे.

Comments are closed.