2047 पर्यंत भारत 40 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होणार – मुकेश अंबानी

Last Updated on November 24, 2022 by Jyoti S.

नवी दिल्ली :2047 पर्यंत भारत 40 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल, हा अंदाज खरा ठरला तर येत्या 25 वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार 13 पटीने वाढेल. भारतीय अर्थव्यवस्थेच्या या विस्तारात स्वच्छ ऊर्जा क्रांती आणि डिजिटलायझेशनचा सर्वात मोठा वाटा असेल, असा दावा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष उद्योगपती मुकेश अंबानी यांनी केला आहे.

गुजरातची राजधानी गांधीनगर येथील पंडित दीनदयाल एनर्जी युनिव्हर्सिटीच्या दीक्षांत समारंभात मुकेश अंबानी म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था सध्या 3 ट्रिलियन डॉलर्सची आहे, परंतु 2047 पर्यंत आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार 40 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल. डॉलरपर्यंत पोहोचेल.आतापासून 2047 पर्यंतचा काळ अमृतकाळ असल्याचे सांगताना अंबानी म्हणाले की, या काळात देशाला आर्थिक विकास आणि संधींचा अभूतपूर्व विस्तार दिसेल. येत्या काही दशकांमध्ये स्वच्छ ऊर्जा क्रांती, जैव ऊर्जा क्रांती आणि डिजिटल क्रांती या तीन मोठ्या क्रांती देशाच्या विकासाला चालना देतील, स्वच्छ ऊर्जा क्रांती आणि जैव ऊर्जा क्रांती आपल्याला ऊर्जा उत्पादन शाश्वत करण्यासाठी मदत हि करेल, तसेच डिजिटल क्रांतीमुळे ऊर्जा वापरामध्ये कार्यक्षमता देखील वाढेल.अंबानी यांचा रिलायन्स समूह या तिन्हीहि क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत चाललेला आहे. पंडित दीनदयाल एनर्जी युनिव्हर्सिटी हे गुजरातमधील एकमेव खासगी मानि विद्यापीठ असून मुकेश अंबानी हे या विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष आहेत.

दरम्यान, मुकेश अंबानींचा हा अंदाज उद्योजक गौतम अदानी यांच्यापेक्षा जास्त आहे. अदानी यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की,2050 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार 30 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.अंबानी म्हणाले कि वाढत्या उपभोग आणि सामाजिक-आर्थिक सुधारणांमुळे ही वाढ होण्याची शक्यता आहे. हेही वाचा : मुकेश अंबानी घेणार अनिल अंबानींची कर्जबाजारी कंपनी