
Last Updated on July 13, 2023 by Jyoti Shinde
Investment education
नाशिक : अलीकडे शिक्षणाबरोबरच मुलीही प्रत्येक क्षेत्रात मुलांच्या बरोबरीने पुढे जात आहेत. त्यामुळेच प्रत्येक पालकाला आपल्या मुलीने चांगले शिक्षण आणि करिअर करावे असे वाटते. तुमच्या मुलीचे आयुष्य सुरक्षित करण्यासाठी सरकारी योजनांची माहिती घ्या.
काही पालकांना आपल्या मुलीला चांगले शिक्षण देऊन वाढवायचे असते आणि नंतर तिचे लग्न थाटामाटात करायचे असते. या कारणास्तव, बरेच पालक मुलीच्या जन्मापासून बचत करण्यास सुरवात करतात आणि तिच्या भविष्यासाठी पैसे वाचवू लागतात.Investment education
जर तुम्हालाही तुमच्या मुलीच्या भविष्याची काळजी वाटत असेल आणि तिच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी खूप बचत करायची असेल तर तुम्ही काही सरकारी योजनांचा नक्कीच लाभ घेऊ शकता.
सरकारने मुलींसाठी विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी विविध बचत योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा योग्य लाभ घेतल्यास आपल्या मुलीच्या भविष्याची चिंता दूर होईल. Investment education
सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या भविष्यासाठी आता एक बचत करणारी आपल्यासाठी उत्तम योजना आहे. ही एक छोटी बचत योजना आहे. मुलीच्या जन्मानंतर तुम्ही 10 वर्षांसाठी या योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्ही वर्षाला फक्त 250 रुपये भरू शकता परंतु जास्तीत जास्त तुम्ही या योजनेत प्रति वर्ष 1.5 लाख रुपये जमा करू शकता.
मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता. या योजनेत सरकार सध्या ७.६ टक्के दराने व्याज देत आहे. अशा प्रकारे मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत तुम्ही चांगली बचत करू शकता. तुम्ही ही योजना आता कोणत्याही सरकारी बँक तसेच पोस्ट ऑफिसमधून सुरू करू शकता.Investment education
सुकन्या समृद्धी योजनेची माहिती डिटेल्स मध्ये पाहण्यासाठी इथे लिंक वर क्लिक करा
बालिका समृद्धी योजना
ही योजना काहीशी सुकन्या समृद्धी योजनेसारखीच आहे. कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींच्या भवितव्यासाठी शासनाने ही योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत मुलीच्या आईला तिच्या जन्माच्या वेळी 500 रुपये अनुदान सुद्धा दिले जाते.
तसेच शिक्षण घेणाऱ्या मुलींना 300 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती पोस्टल खात्यात जमा केली जाते. ती मुलगी १८ वर्षांची झाल्यावर उर्वरित रक्कम आपणास काढता येईल.Investment education
माझी कन्या भाग्यश्री योजना
ही विशेष योजना महाराष्ट्र शासन राबवते. महिला शिक्षणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २०१६ मध्ये ही योजना सुरू केली होती. या योजनेमध्ये जर मुलीच्या जन्मानंतर पालकांनी त्याची नसबंदी करून घेतली तर मुलीच्या नावावर 50,000 रुपये जमा केले जातात.
दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन केल्यास दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी २५ हजार रुपये जमा केले जातात. या योजनेत कोणतेही व्याज दिले जात नाही आणि मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर संपूर्ण रक्कम दिली जाते.Investment education
माझी कन्या भाग्यश्री योजना ह्या योजनेची माहिती डिटेल्स मध्ये पाहण्यासाठी इथे क्लिक करा
लेक लाडकी योजना
आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना शिक्षण मिळावे आणि त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षात ही योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत, सरकार हे त्या मुलीच्या जन्मापासून ते ती १८ वर्षांची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत करत असते.
या योजनेत मुलीच्या जन्मावर 5000 रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे ती जेव्हा प्रथम श्रेणीत जाईल तेव्हा सरकार 4 हजार रुपये देईल. ६वीला ६ हजार रुपये आणि ११वीला ८ हजार रुपये इतके दिले जातील. त्यानंतर आता मुलगी हि 18 वर्षांची झाल्यानंतरच तिला 75 हजार रुपये दिले जातील.
लेक लाडकी योजना ह्या योजनेची माहिती डिटेल्स मध्ये पाहण्यासाठी इथे क्लिक करा
CBSE उडान योजना
ही योजना मनुष्यबळ विकास मंत्रालयामार्फत राबविण्यात येते. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा उद्देश अभियांत्रिकी आणि तांत्रिक महाविद्यालयांमध्ये मुलींची संख्या वाढवणे हा आहे.Investment education
10वीमध्ये किमान 70 टक्के आणि गणित आणि विज्ञान विषयात किमान 80 टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेत मुलींना ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत बसण्यासाठी अभ्यास साहित्य आणि प्री-लोड केलेले टॅब प्रदान केले जातात.
याशिवाय प्रत्येक राज्यात मुलींच्या शिक्षणासाठी संबंधित राज्य सरकारकडून विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ घेऊन तुम्ही मुलींच्या शिक्षणावरील खर्चात बचत करू शकता. तसेच तुम्ही त्यांना उच्च शिक्षण देऊ शकता.Investment education