Last Updated on May 6, 2023 by Jyoti S.
Jio Recharge Plans 2023 : दर महिन्याला रिचार्ज करण्याचे टेन्शन संपले! Jio ने लॉन्च केला सर्वात स्वस्त 388 दिवसांचा रिचार्ज प्लान, अधिक जाणून घ्या
जिओ टेलिकॉम कंपनी येत्या काही दिवसात ग्राहकांसाठी अनेक स्वस्त प्लॅन ऑफर करत आहे. त्याचमुळे जिओ ग्राहकांना आता स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅन मिळत आहे . जिओ ग्राहक स्वस्त रिचार्ज प्लॅनसह पैसे वाचवत आहेत.
भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Jio ने आपल्या ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त(Jio Phone Plans 2023) एक वर्षाचा रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. अशा स्थितीत आता दर महिन्याला रिचार्ज करण्याचे ग्राहकांचे टेन्शन संपले आहे.
जिओने ग्राहकांसाठी ३८८ दिवसांचा रिचार्ज प्लॅन आणला आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये Jio कंपनीकडून अनेक सुविधा मोफत दिल्या जातात. या रिचार्ज प्लॅनची किंमत ग्राहकांना दररोज 8 रुपयांपेक्षा कमी असेल.
भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओच्या स्पेशल रिचार्ज प्लानबद्दल बोलायचे झाले तर यूजर्सना यामध्ये 388 दिवसांची वैधता मिळते. इतर दूरसंचार कंपन्या केवळ 365 दिवसांची वैधता देतात. तसेच, आता या रिचार्ज प्लॅनमध्ये एकूण 75GB अतिरिक्त इंटरनेट डेटा हा मोफत मिळतोय
रिलायन्स जिओ रिचार्ज प्लॅन 388 दिवसांच्या वैधतेसह
रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी 388 दिवसांसाठी 2,999 रुपयांचा रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये, ग्राहकांना अमर्यादित कॉलिंगसह दररोज 2.5GB इंटरनेट सुद्धा ऑफर केले जाणार आहे . तसेच Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud हे सर्व मोफत वापरासाठी प्रदान केले आहेत.
5G क्षेत्रात अमर्यादित 5G इंटरनेट उपलब्ध असेल
रिलायन्स जिओने अलीकडेच देशातील अनेक शहरांमध्ये 5G इंटरनेट सुविधा सुरू केली आहे.(Jio Phone Plans 20236) त्यामुळे तुम्हीही 5G हायस्पीड इंटरनेटचा लाभ घेऊ शकता. यामध्ये कंपनीकडून अनलिमिटेड 5G सेवा दिली जात आहे. त्यामुळे तुम्हीही या रिचार्ज प्लॅनवर 388 दिवस मोफत आणि अमर्यादित 5G हायस्पीड इंटरनेटचा आनंद घेऊ शकता .
Comments 7