Last Updated on December 24, 2022 by Jyoti S.
jio plan 2023 :जिओ’कडून ‘हॅप्पी न्यू इयर’ प्लॅन लाॅंच, ग्राहकांना नववर्षात मिळणार धमाकेदार सुविधा…
रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. 2022 हे वर्ष संपण्यास अवघे काही दिवस बाकी राहिले असून, लवकरच 2023 हे नवीन वर्ष सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘रिलायन्स जिओ’ने आपल्या ग्राहकांसाठी धमाकेदार रिचार्ज प्लॅन सादर केला आहे.
नवीन वर्षानिमित्त ‘जिओ(‘jio plan 2023)’ कंपनीने हॅप्पी न्यू इयर 202 ऑफरची घोषणा केली आहे. आता ह्या सगळ्या सोबतच 2999 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनला अपडेट केले असून, आता हा प्लॅन त्यांनी नवीन वर्षानुसार 2023 रुपये किंमतीचा करण्यात आला आहे. या प्लॅनबाबत सविस्तर जाणून घेऊ या..हेही वाच: Instagram: इंस्टाग्रामवर मेसेज सुरक्षित आहेत का? ‘हे’ फिचर लगेच वापरा..
2023 रुपयांचा प्लॅनबाबत…
▪️ रिलायन्स जिओच्या या पूर्ण प्लॅनची वैधता आता 252 दिवस, म्हणजेच 9 महिन्यांचीच आहे.
▪️ प्लॅनमध्ये रोज 2.5 जीबी डेटा, याप्रमाणे एकूण 630 जीबी डेटा मिळेल, डेटा समाप्त झाल्यानंतर 64 केबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरता येईल.
▪️ आणि ह्या सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाॅईस कॉलिंगची सुविधा पण दिली जाते. (अनलिमिटेड एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग)
▪️ प्लॅनमध्ये कंपनी 23 दिवसांची अतिरिक्त वैधता देते. तसेच तुम्हाला 75 जीबी अतिरिक्त डेटाचा फायदा सुद्धा मिळेल
▪️ तसेच त्या सोबत जिओ सिनेमा, जिओ क्लाउड आणि जिओ सिक्योरिटी सारख्या अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.
▪️ नवीन रिचार्ज सोबत दररोज साठी 100 एसएमएस दिले जातात.