Last Updated on January 4, 2023 by Jyoti S.
Mobile rates will increase: कंपन्यांकडून दरवाढ होण्याची शक्यता
दिल्ली : नव्या वर्षात म्हणजेच 2023 मध्ये मोबाइल वापरणे महाग होणार आहे. या वर्षात दूरसंचार कंपन्या दरवाढ करण्याची शक्यता आहे तसेच ५जी स्मार्टफोनची विक्रीही वाढणार आहे.
एका अहवालानुसार, दूरसंचार कंपन्या ५जी अपग्रेड(Mobile rates will increase) करणे आणि परिचालन खर्च कमी करणे, यासाठी दरवाढ करू शकतात. ५जीसाठी सध्या स्वतंत्र टेरिफ प्लॅन सादर करण्यात आलेला नाही. मात्र, काही महिन्यांमध्ये तशी शक्यता आहे. सध्या कंपन्या ५जी सेवेच्या विस्तारावर भर देत आहेत.
5G हॅण्डसेटची विक्री वाढणार
केलेल्या एका अहवालानुसार, संशोधन संस्था ‘काउंटरपॉइंट’ने(By counterpoint) जारी २०२३च्या अखेरपर्यंत ४जीपेक्षा ५जी हॅण्डसेट अधिक विकले जाण्याची शक्यता आहे. एप्रिल – जूनच्या तिमाहीत १० कोटीपेक्षा अधिक ५जी स्मार्टफोन विकले जाण्याची शक्यता आहे.
काही शहरांमध्येच ही सेवा सुरू असून, अद्याप पूर्ण ५जी कव्हरेज नाही. त्यामुळे स्वतंत्र ५जी प्लॅन सादर करण्याचे कंपन्यांनी टाळले आहे.
हेही वाचा: C-type charger : भारतात ‘सी टाईप’ चार्जर नसलेल्या स्मार्टफोनची विक्री बंद होणार, ‘ही’ आहे डेडलाईन..
10 हजारांत मिळणार 5G फोन
कंपन्या १० हजार रुपयांपर्यंतचा ‘एंट्री लेव्हल’चा(entry level) ५जी स्मार्टफोन भारतीय बाजारात उतरविण्याच्या तयारीत आहेत.
■ कच्च्या मालाची टंचाई, भू-राजनैतिक अस्थिरता आणि महागाई यांसारख्या समस्यांमुळे हॅण्डसेटची विक्री वृद्धी कमी राहण्याची शक्यता आहे.