Mortgage recovery: दीडशेपैकी 117 कोटींची यंदा घरपट्टीवसुली

Last Updated on December 13, 2022 by Jyoti S.

Mortgage recovery: महापालिका प्रशासनाला दिलासा; शंभर टक्के उद्दिष्ट टाकण्यासाठी प्रयत्न

नाशिक, ता. १२ स्थायी समितीने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करताना महसुलात जवळपास ४०० कोटी रुपयांची तूट येत असल्याच्या पार्श्वभूमी मालमत्ता करत मात्र समाधानकारक वसुली होत आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीला काही प्रमाणात आधार मिळताना दिसत आहे. पाणीपट्टीच्या माध्यमातूनदेखील जवळपास ३१ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे.

आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

मालमत्ता कराच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत निधी जमा होतो. व्यावसायिक व वाणिज्य अशा प्रकारात शहरात जवळपास पावणेचार लाख मालमत्ता आहे. या मालमत्तांच्या माध्यमातून यंदा दीडशे कोटी रुपये महसुलाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. (Mortgage recovery)आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर कर विभागाच्या माध्यमातून आगाऊ कर भरल्यास पहिले तीन महिने सूट दिली जाते. त्यानंतर मार्च महिन्यात समाधानकारक वसुली होते. यंदा मात्र डिसेंबर अखेरपर्यंत जवळपास ११७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. उर्वरित जवळपास ३२ कोटी रुपये मार्च महिन्यापर्यंत वसूल होतील, असा विश्वास विविध कर विभागाला आहे. नियमित कर वसूल होत असताना दुसरीकडे मात्र थकबाकीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. थकबाकी वसूल झाल्यास महापालिकेच्या तिजोरीत दीडशे ते दोनशे कोटी रुपयांची भर पडेल, मात्र थकबाकीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

पाणीपट्टीची समाधानकारक वसुली थकबाकी वगळता पाणीपट्टीच्या माध्यमातून ७५ कोटी डिजिटल चलनामुळे दर्शनी चलनाचा अनादर

रुपये महसुलाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. यातून जवळपास ३२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. घरपट्टी(Mortgage recovery) व पाणीपट्टी वसूल करताना विविध कर विभागाला मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. संपूर्ण शहरातून वसुली करण्याची जबाबदारी ८० कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. या कर्मचाऱ्यांना फक्त वसुली हेच उद्दिष्ट नाही, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा निवडणूक आयोगाकडून निश्चित केलेल्या कामांची जबाबदारीदेखील पार पाडावी लागते. अशा परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांकडून होणारी वसुली समाधानकारक असल्याचे मानले जात आहे.