Saturday, March 2

Mulching Paper Subsidy For Farmer: शेतकऱ्यांना आता मल्चिंग पेपरवर 50 टक्के अनुदान मिळणार; योजनेचे निकष, पात्रता आणि अर्जाची पद्धत; वाचा….

Last Updated on May 24, 2023 by Jyoti S.

Mulching Paper Subsidy For Farmer : शेतकऱ्यांसाठी मल्चिंग पेपर सबसिडी गेल्या काही दशकांमध्ये शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायात मोठे बदल झाले आहेत. आता शेतकरी माणसं हि पारंपरिक शेतीऐवजी जास्त आधुनिक शेतीवर भर देत आहेत.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

शेतकऱ्यांनी आता पारंपरिक पिकांऐवजी नगदी पिकांसह फळबाग आणि भाजीपाला पिके घेण्यास सुरुवात केली आहे. आता शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांच्या लागवडीत आधुनिक पद्धतींचा अवलंब केला आहे. आता भाजीपाल्याची लागवड मल्चिंग पेपरने केली जाते.

त्याचमुळे आता शेतकऱ्यांना त्यांच्या भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन घेणे अधिक शक्य होत आहे. शेतकर्‍यांसाठी हे निश्चितच फायदेशीर आहे. परंतु मल्चिंग पेपरसाठी(Mulching Paper Subsidy For Farmer) शेतकऱ्यांना जास्त खर्च करावा लागतो, त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढून उत्पादन घटते.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी सरकार हे आता मल्चिंग पेपरवर सुद्धा अनुदान देत आहे. आता एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेंतर्गत ह्या शेतकऱ्यांना प्लास्टिक मल्चिंगसाठी मोठं अनुदान मिळत आहे.

मल्चिंग पेपरचा वापर करून पिकाच्या वाढीसाठी पोषक तत्त्वे तयार केली जात आहेत. त्याच्या वापराने पिकांमध्ये तण उगवत नाही आणि पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. परिणामी पीक उत्पादनात वाढ होते. तणनाशकांची फवारणी करण्याची गरज नसल्यामुळे खर्चात बचत होते आणि दर्जेदार उत्पादन मिळते.

हेही वाचा:

Summer Onion Price Hike 2023 : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे उन्हाळ्यात कांद्याच्या दरात मोठी वाढ…

पार्श्‍वभूमीवर, शासनामार्फत एकात्मिक उत्पादन विकास योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्लास्टिक मल्चिंग पेपरसाठी ५० टक्के अनुदान मिळत आहे. साधारणपणे एक हेक्टर क्षेत्रावर मल्चिंग पेपर लावण्यासाठीMulching Paper Subsidy For Farmer) आता शेतकऱ्यांना 32000 रुपये एवढा खर्च येत असतो.

यातील ५० टक्के अनुदान शासनाकडून दिले जाते, म्हणजे १६ हजार हेक्टरला शासनाकडून अनुदान मिळते. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना हे अनुदान दोन हेक्टर मर्यादेत मिळते, अर्थातच एका शेतकऱ्याला मल्चिंग पेपरसाठी ३२ हजारांपर्यंत अनुदान मिळू शकते.

कोणत्या शेतकऱ्यांना फायदा?

या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गट, सहकारी संस्था यांना मल्चिंग पेपरसाठी अनुदान मिळत आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्यास नक्कीच मदत होत आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे करावा?

ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना इतर शेतकरी लाभ योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागतो, त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना मल्चिंग पेपरसाठी अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा. mahadbtmahait.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन शेतकरी आपला अर्ज सादर करू शकतील.

कोणती कागदपत्रे हवी आहेत?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, सातबारा उतारा, 8 अ, आधार लिंक केलेले बँक खाते, मोबाईल क्रमांक, बँक पासबुक, रेशनकार्ड यासारखी आवश्यक कागदपत्रे आवश्यक असतील

अधिकृत वेबसाईट वर जाण्यासाठी इथे क्लिक करा