Last Updated on January 16, 2023 by Jyoti S.
Narayan Rane : जूनपर्यंत देशाला आर्थिक मंदीचा सामना करावा लागू शकतो – केंद्रीय मंत्री नारायण राणे
Table of Contents
आजपासून जी-20 शिखर परिषद सुरू होत आहे. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांच्या हस्ते झाले. आजपासून इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुपची दोन दिवसीय बैठक होणार आहे. सहभागी देश आणि संस्था पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याच्या विविध पैलूंवर विचारमंथन करतील.
या बैठकीला IWG सदस्य देश, अतिथी देश आणि भारताने आमंत्रित केलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे ६५ प्रतिनिधी उपस्थित आहेत. दरम्यान, ते भारताच्या G-20 अध्यक्षतेखाली 2023 च्या पायाभूत सुविधांच्या अजेंडावर चर्चा करतील. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आर्थिक मंदीची भीती व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi )यांच्या नेतृत्वाखाली आपण देशाला पुढे नेत आहोत, आपला जीडीपी प्रचंड वेगाने वाढत आहे आणि आठ वर्षांपूर्वी आपला देश दहाव्या क्रमांकावर होता. आता आपला देश पाचव्या क्रमांकावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळेच हे शक्य झाले आहे.
येत्या दहा वर्षांत आपण तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू, अशी शक्यता राणे यांनी व्यक्त केली. यासोबतच जगातील मोठ्या देशांमध्ये आर्थिक मंदीचे सावट आहे.
हेही वाचा: Amol Mitkari : आता लवकरच या शहराचे नाव बदलणार?
भारताला याचा त्रास होऊ नये आणि जर मंदी असेल तर ती जूननंतर येईल. मंदीचे परिणाम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू नयेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत’, असे नारायण राणे(Narayan Rane) म्हणाले.