Last Updated on March 21, 2023 by Jyoti S.
nashik ST buss update
थोडं पण महत्वाचं
नाशिक(Taluka post) : महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना लागू करण्यात आली आहे. मात्र, याबाबत महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
नाशिक: नुकत्याच सादर झालेल्या 2023-24 च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. आता सरकारने सर्व प्रकारच्या एसटी बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के एवढी सवलत जाहीर करण्यात आली आहे . एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना १७ मार्च २०२३ पासून लागू करण्यात आली आहे. हा निर्णय महिलांच्या हिताचा असल्याचे राज्य सरकारचे मत असले तरी नाशिकमधील महिलांनी मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बसमध्ये तिकिटात सवलत देऊन आम्ही काहीही करू शकणार नाही. महागाई वाढली त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरवर सवलत द्या. तसेच घरगुती गॅस सिलिंडर किंमत वाढल्यामुळे ते खरेदी करणे प्रत्येक सामान्य माणसाला कठीण झाले आहे. अवाच्या किमती जवळपास निम्म्या झाल्या आहेत. त्यामुळे आता काय करायचे असा प्रश्न नाशिकच्या महिलांनी उपस्थित केलेला आहे.