
Last Updated on June 24, 2023 by Jyoti Shinde
Ola electric vehicle
ओला इलेक्ट्रिक नवीन स्कूटर आणणार असल्याची माहिती सीईओ भाविश अग्रवाल यांनी दिली आहे.
नाशिक : देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी पावसाळ्यात पुन्हा एकदा धमाका करणार आहे. पेट्रोल टू-व्हीलर कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी ओला नवीन कमी किमतीची स्कूटर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. विशेष बाब म्हणजे हेल्मेट घातल्याशिवाय ही स्कूटर सुरू होणार नाही, हे वैशिष्ट्य सर्व ओला स्कूटरमध्ये येण्याची शक्यता आहे.(Ola electric vehicle)
ओला इलेक्ट्रिक नवीन स्कूटर आणणार असल्याची माहिती सीईओ भाविश अग्रवाल(Bhavish agrawal) यांनी दिली आहे. सध्या पेट्रोल स्कूटरच्या किमती 80 ते 1 लाखांच्या आसपास आहेत. त्यापेक्षा इलेक्ट्रिक स्कूटर 24 ते 50 हजारांनी महागल्या आहेत. यासोबतच पेट्रोल स्कूटरच्या किमतीत इलेक्ट्रिक स्कूटर आणल्यास ग्राहकांना अधिक चांगला पर्याय उपलब्ध होईल.(Ola electric vehicle)
हेही वाचा: Ration card : इतके प्रकार आहेत रेशन कार्डाचे, तुम्ही कशाचे हक्कदार! पहा
ओला ही स्कूटर जुलै महिन्यात लॉन्च करू शकते. भाविशने एंड आईस एज शोला भाग-१ असे नाव दिले आहे. या स्कूटरमध्ये एलईडी लाईट्स, एलईडी डीआरएल देण्यात येणार आहेत. डिझाईन सारखेच राहणार असले तरी नवीन फीचर्स सादर केले जाऊ शकतात. जुलैच्या कार्यक्रमात काही नवीन घोषणाही केल्या जाऊ शकतात.
सध्या, ओला स्कूटरची किंमत 1.10 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 1.40 लाखांपर्यंत जाते. FAME 2 इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती जून 2023 पासून सबसिडी कपातीनंतर वाढणार आहेत. त्यामुळे विक्रीही कमी झाली आहे.(Ola electric vehicle)