
Last Updated on January 18, 2023 by Jyoti S.
PAN Aadhaar Link : तुमच्याकडे पॅनकार्ड असेल आणि तुम्हाला भविष्यात कोणत्याही समस्येचा सामना करायचा नसेल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा.
Table of Contents
तुमच्याकडे पॅनकार्ड असेल आणि तुम्हाला भविष्यात कोणत्याही समस्येचा सामना करायचा नसेल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा. याकडे दुर्लक्ष केल्यास तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाऊ शकते. आयकर विभागाने ट्विट करून पॅन कार्डधारकांना सतर्क केले आहे.
विभागाने ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे की 31 मार्च 2023 पर्यंत तुमचे पॅन कार्ड आधारशी लिंक करा (PAN-Aadhaar Link) अन्यथा १ एप्रिलपासून कार्ड निष्क्रिय केले जाईल.
आयकर विभागाने मंगळवारी, १७ जानेवारी रोजी विभागाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पॅनकार्डधारकांना ही माहिती दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘आयकर कायदा, 1961 नुसार, सर्व पॅनकार्ड धारकांना (जे सूट मिळालेल्या कोणत्याच श्रेणीत येत नाहीत) 31 मार्च 2023 पूर्वी त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक करणे खूपच अनिवार्य आहे. 1 एप्रिल 2023 पासून अनलिंक केलेले पॅन निष्क्रिय होणार आहे . ‘तत्काळ सूचना. उशीर करू नका, आजच लिंक करा!’ असे त्यात विभागाने लिहिले आहे.
…तर अडचणींचा सामना करा, आयकर विभागाचा हा संदेश हलक्यात घेतल्यास तुमच्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण आजच्या काळात पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे जे तुमच्या प्रत्येक आर्थिक बाबीशी संबंधित आहे.
कार्डवर टाकलेल्या क्रमांकाद्वारे कार्डधारकांची(PAN Aadhaar Link) संपूर्ण आर्थिक माहिती विभाग नोंदवतो. अशा परिस्थितीत हा इशारा गांभीर्याने घ्यायला हवा, अन्यथा तुम्ही आणखी संकटात सापडू शकता.
Comments are closed.