Pik vima nondani navin niyam: नुकसानीनंतर ७२ तासांत तक्रार केली तरच नुकसान भरपाई मिळणार नवीन नियम पहा!

Last Updated on October 9, 2023 by Jyoti Shinde

Pik vima nondani navin niyam

शासनाची हेल्पलाइन : शेतकऱ्यांसाठी फायद्याचे

नाशिक : शेतकऱ्याला शासकीय मदत

पदरात पाडून घ्यावयाची असेल तर नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आतमध्ये नुकसानीचा दावा तो ही ऑनलाइन करायचा आहे.

मात्र, पाऊस पडून किंवा पिकाचे नुकसान होऊन ७२ तास उलटले तरी शेतात पाणी साचलेले आहे किवा नुकसानीपर्यंत जाणे अवघड होऊन बसले आहे, तर शासनाकडून पीक पंचनामा झाल्याशिवाय मदत मिळणार नाही. शिवाय पावसामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीही वेगळ्याच असतात. साचलेल्या पाण्यामुळे शेतामध्येच आता अजिबात प्रवेश करता येत नाही, त्यामुळे आता नुकसानीचा दावा करावा कसा असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना भेडसावत आहे.Pik vima nondani navin niyam

या सहा पद्धतीने नोंदवता येणार तक्रार

शेतकऱ्यांना ‘क्रॅप इन्शुरन्स अँप यामाध्यमातून झालेल्या नुकसानीची माहिती स्वतः भरायची आहे. याद्वारे तुम्ही आता हि माहिती भरल्यानंतर तेथील अधिकारी,कर्मचारी हे पंचनाम्यासाठी लगेच शेतकऱ्यांच्या बांधावर येणार आहेत.

विमा कंपनीने १८००४१९५००४ हा टोल फ्री क्रमांक आम्ही दिला आहे. याद्वारेही शेतकरी झालेल्या नुकसानीची माहिती सांगू शकतात. तालुक्याच्या ठिकाणी विमा कंपनीच्या कार्यालयात शेतकरी हे ऑफलाइनही तक्रार करू शकतात. कंपनीकडून देण्यात आलेल्या फॉर्मवर आवश्यक ती माहिती भरावी लागणार आहे.Pik vima nondani navin niyam

हेही वाचा: Bachat Gat Mini Tractor Yojna: मिनी ट्रॅक्टर्ससाठी तीन लाखांचे दिले जाते अनुदान; जिल्ह्यात २८ बचतगटांची निवड,यात तुमचा पण गट आहे का पहा.

ज्या बँकेत शेतकऱ्यांनी आपला विमा भरलेला आहे त्या बँकेच्या शाखेतही शेतकऱ्यांना तक्रारीचा अर्ज करता येणार आहे.

शेतकऱ्यांना नुकसान झाल्याचे विमा कंपनीला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून म्हणजे ऑनलाइन किंवा ऑफलाइन हे कळवावेच लागणार आहे.

नुकसानीचा दावा न केल्यास काय होणार?

सध्या ओढवलेल्या परिस्थितीमध्ये शेतकरी हा नुकसानीचा दावा करू शकला नाही तर काय होणार…. यावर पीक विमा कंपनाने काय पर्याय काढला आहे का? तर आता याचे उत्तर आहे असा कुठलाच पर्याय शेतकऱ्यांकडे उरलेले नाही.

1 नुकसानीच्या दाव्याशिवाय शेतकऱ्याला मदत मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान झाल्याचे विमा कंपनीला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून म्हणजे ऑनलाइन किंवा ऑफलाइन हे कळवावेच लागणार आहे.Pik vima nondani navin niyam

काय चित्र आहे गावशिवारात

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अॅपद्वारे तक्रार नोंदिवण्याची तांत्रिक माहिती नाही. त्यामुळे ज्या तरुणाला याचे ज्ञान अवगत आहे त्या तरुणाकडून ॲपद्वारे माहिती भरून नुकसानभरपाईसाठी पात्र होण्यास शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे.

हेही वाचा: Zenduchya Fulanchi Bag Anudan: झेंडूच्या फुलांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार २८ हजार रुपये अनुदान, येथे अर्ज करा

पिक पेरणीपासून काढणीच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, दुष्काळ पावसातील खंड, पूर. क्षेत्र जलमय होणे, किड व रोगाचा व्यापक प्रादूर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग. वीज कोसळणे, वादळ, गारपिट आणि चक्रीवादळ यासारख्या टाळता न येणाया जोखमीमुळे पिकांच्या उत्पादनात येणाऱ्या या घटीपासून व्यापक विमा संरक्षण दिले जाते.Pik vima nondani navin niyam