Last Updated on May 13, 2023 by Jyoti S.
PM kisan 14th hapta: तुम्ही जर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आता अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण पुढच्या आठवड्यात लवकरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील.
या महिन्याच्या अखेरीस म्हणजे मे 2023 पर्यंत, सरकार या योजनेच्या हप्त्यातून 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करू शकते. मात्र, पुढील हप्ता कधी जाहीर होणार याबाबत केंद्र सरकारने अजूनही घोषणा केलेली नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 फेब्रुवारी 2023 रोजी कर्नाटकातील बेलगावी येथे आयोजित कार्यक्रमात 13 व्या हप्त्यातील 16,800 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले आहेत.
त्याचवेळी 8 कोटी 2 लाख शेतकऱ्यांना 13 वा हप्ता मिळाला आहे. आता आपले केंद्र सरकार हे शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये ६,००० रुपये देत आहे . हा पैसा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जातो. यामुळे सरकारने पाठवलेल्या पैशात कोणीही छेडछाड करू शकत नाही. या योजनेतील नोंदणी अद्याप सुरू आहे.
\
याप्रमाणे खालील स्टेप्स वापरून आले नाव यादीत तपासा
सर्वप्रथम तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर जावं लागेल , आता ‘फार्मर्स कॉर्नर’ या पर्यायावर लगेच क्लिक करा.
त्यानंतर लाभार्थी स्थितीवर क्लिक करा.
आता लवकर तुम्ही तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, तसेच ब्लॉक आणि गावाचे नाव सर्व काही तिथे टाका .यानंतर, ‘Get Report’ पर्यायावर क्लिक केल्यावर संपूर्ण यादी तुमच्यासमोर उघडेल.
आता तुम्ही या यादीमध्ये तुमच्या हप्त्याचे तपशील सर्व पाहू शकता. येथे तुम्हाला स्टेटसच्या पुढे ई-केवायसी, पात्रता आणि लँड साइडिंगचा संदेश दिसेल.
ई-केवायसी तसेच पात्रता आणि जमीन साईडिंग अर्थात या तिघांच्या पुढे ‘हो’ लिहिल्यास तुम्हाला हप्त्याचा लाभ लवकर मिळू शकतो.
या तिघांच्या पुढे किंवा कोणाच्याही समोर ‘नाही’ लिहिल्यास ती व्यक्ती हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकते.
Comments 2