Pradhan Mantri Ujjwala Yojana 2023 : गॅस सिलिंडर अनुदानाबाबत मोठी घोषणा! आता तुम्हाला अधिक नफा मिळेल

Last Updated on March 25, 2023 by Jyoti S.

Pradhan Mantri Ujjwala Yojana 2023

मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना(GPradhan Mantri Ujjwala Yojana 2023) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने शुक्रवारी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) अंतर्गत मोठी घोषणा केली आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

या निर्णयानुसार एलपीजी सिलिंडरवरील( Gas subsidy 2023) 200 रुपयांचे अनुदान एक वर्षासाठी वाढवण्यात आले आहे. ग्रामीण आणि वंचित गरीब कुटुंबांना एलपीजी पुरवण्यासाठी, केंद्र सरकारने गरीब कुटुंबातील महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्यासाठी मे 2016 मध्ये PMUY लाँच केले. शासनाच्या या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदान थेट जमा केले जाते.

??एलपीजी सिलिंडरवर सबसिडी मिळवण्यासाठी हे काम करा??

या योजनेअंतर्गत आता वर्षभरात पुर्ण 12 गॅस सिलिंडरचे वितरण केले जाते. सध्या ग्राहकांना प्रति सिलेंडर 200 रुपये हि सबसिडी मिळत आहे. एकूण, अनुदान एका वर्षात 2400 रुपयांपर्यंत असू शकते. आता 1 मार्च 2023 पर्यंत PMUY चे 9.59 कोटी एवढे लाभार्थी आहेत.

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता मोठा दिलासा

आता 1 मार्च 2023 पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे(Pradhan Mantri Ujjwala Yojana 2023) 9.59 कोटी इतके लाभार्थी आहेत. एका सरकारी प्रकाशनात म्हटले आहे की, विविध भू-राजकीय घटकांमुळे एलपीजीच्या आंतरराष्ट्रीय किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. PMUY लाभार्थ्यांसाठी योजनेची तारीख वाढवण्याचा मुख्य उद्देश गरीबांना एलपीजीच्या उच्च किमतींपासून वाचवणे हा आहे.

??होळीपूर्वी महागाई भडकली..!! घरगुती गॅस सिलिंडरच्या दारात मोठी वाढ??

त्याचा फायदा कसा होईल?


या योजनेचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे.यामुळे देशातील PMUY ग्राहकांचा सरासरी हि LPG वापर 2019-20 मधील 3.01 रिफिलवरून 20 टक्क्यांनी वाढून 2021-22 मध्ये 3.68 इतका झाला आहे.

PMUY म्हणजे काय

या योजनेअंतर्गत वर्षभरात पूर्ण 12 अनुदानित गॅस सिलिंडर दिले जात असतात . प्रति सिलिंडर 200 रुपये सबसिडी मिळते. या योजनेअंतर्गत ग्राहकांना वर्षाला 2400 रुपयांपर्यंतचे फायदे मिळतात.

??केंद्र सरकारचा मोठा निर्णय, आता 300 रुपयांना मिळणार गॅस सिलिंडर, ऑनलाइन अर्ज सुरू

??