Last Updated on March 7, 2023 by Jyoti S.
Rain fall
थोडं पण महत्वाचं
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत गारपिटीने मोठे नुकसान झाले आहे.
धुळे/नंदुरबार, 6 मार्च राज्यभरात होळीचा सण साजरा होत असतानाच उत्तर महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये गारपीट झाली आहे. याचा एक व्हिडीओ समोर आला असून, हे काश्मीर आहे असे वाटू शकते. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागात जोरदार गारपीट झाली. सायंकाळी पाचच्या सुमारास सुरू झालेल्या या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
धुळे जिल्ह्यातील(Rain fall) खोरी टिटणे परिसरात जोरदार गारपीट झाली. गारपिटीनंतर काश्मीरप्रमाणेच सर्वत्र बर्फाची चादर दिसून आली. तासभर झालेल्या गारपिटीमुळे परिसरातील शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्वच रस्त्यांवर तसेच शेतात जोरदार गारा पडल्या. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातील खोरी आणि आष्टे विभागात जोरदार गारपीट झाली. जिल्ह्यातील नंदुरबार, अकलकुवा, शहादा, तळोदा, नवापूर येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, बीड आणि उत्तर महाराष्ट्रात सध्या पावसाची शक्यता आहे. बदलापूरमध्येही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
निसर्गाचा सण होळी धुळवड
भारतीय हवामान खात्याने अनेक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. सध्या कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली असून, ६ आणि ७ मार्च रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळ आणि संध्याकाळचे किमान तापमान कमी असल्याने पुण्यात सध्या थंडी जाणवत आहे.
हेही वाचा: या 11 जिल्ह्यांमध्ये 10 मार्चपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे, पाहा आजचा हवामान अंदाज
कोकण, गोवा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किरकोळ वाढ झाली आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सकाळी आणि रात्री रिमझिम पाऊस पडत असून किमान तापमान 16 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. तसेच दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने दुपारच्या वेळी कडक सूर्यप्रकाशाचा त्रास होत नसल्याचे चित्र आहे.
हवामान खात्याचे अतिरिक्त महासंचालक डॉ. कृष्णानंद होसलीकर म्हणाले, “पुण्याच्या हवामानात सध्या काही वेगळेच अनुभव येत आहेत. तसेच येत्या आठवडाभरात उत्तर महाराष्ट्र, दक्षिण मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात अपेक्षित आहे.
हेही वाचा: Sukanya Samriddhi Yojana : फक्त ह्या दोन दिवसातच सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडा.