Monday, February 26

Ration Card Update :त्या त्या महिन्यातच रेशन घ्या, नाहीतर विसरा!

Last Updated on October 31, 2023 by Jyoti Shinde

Ration Card Update :-  लाभ कोणाला : दुकानदारांना की रेशनकार्डधारकांना त्या त्या महिन्यातच रेशन घ्या, नाहीतर विसरा!

लाभ कोणाला : दुकानदारांना की रेशनकार्डधारकांना त्या त्या महिन्यातच रेशन घ्या, नाहीतर विसरा!

लाभ कोणाला : दुकानदारांना की रेशनकार्डधारकांना


नाशिक : स्वस्त धान्य दुकानातून रेशनकार्डधारकांना मिळणारे धान्य आता त्यांना त्याच महिन्यात घ्यावे लागणार आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांकडून अन्नधान्याच्या होणाऱ्या काळ्याबाजाराला चाप लागणार असून कार्डधारकांनादेखील त्या-त्या महिन्यातच धान्य घेण्याची सवय लागणार आहे. या निर्णयामुळे नेमका लाभ कुणाला होणार, असा प्रश्न विचारला जात आहे.Ration Card Update

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ देण्यात येतो. कार्डधारकाला त्या महिन्यात धान्य घेणे शक्य झाले नाही तर पुढील महिन्याच्या सात तारखेपर्यंत त्याला धान्य उचलता येत होते. परंतु आता त्या-त्या महिन्यात धान्य घेतले तरच त्याला पुढील महिन्यात धान्य घेता येणार असल्यामुळे रेशनकार्डधारकांची अडवणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.Ration Card Update

यापूर्वी लाभार्थ्याला पुढील महिन्याच्या सात तारखेपर्यंत धान्य घेण्याची मुभा होती. त्यामुळे एकदा धान्य घेण्याचे चुकले, तरी पुढील सात तारखेपर्यंत मागील व चालू महिन्याचे असे दोनवेळचे धान्य एकाच वेळी लाभार्थ्याला मिळत होते. मात्र, आता एकाच महिन्याची सक्ती करण्यात आली आहे.

शिल्लक धान्याचा साठा आणि अतिरिक्त साठा यांचा हिशेब जिल ठेवण्यास दुकानदारांना अडचणी येत असल्याने अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाने म्हटले आहे. मात्र रेशनकार्डधारकांना अडचण वाटत असून, मागील महिन्यात घेतले नाही; मग पुढील महिन्याचे बंद झाले, अशी सबब दिली आहे .

त्या त्या महिन्यातच घ्यावे लागणार रेशन

अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार आता त्या- (HP) त्या महिन्यातच आता रेशनवरील धान्य कार्डधारकांना घ्यावे लागणार आहे. यापूर्वी पुढील महिन्याच्या सात तारखेपर्यंत मागील धान्य घेण्याची मुदत होती; परंतु आता धान्याचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी त्या-त्या महिन्यातच धान्य घ्यावे लागणार आहे.

शिल्लक धान्याचा प्रश्नही निकाली

या निर्णयामुळे शिल्लक धान्य किती राहिले याचा ताळमेळ बसविणे सोपे होणार आहे. मागील महिन्याच्या आणि चालू महिन्याच्या वितरित झालेल्या आणि शिल्लक धान्याचा ताळमेळ बसविणे रेशन दुकानदार आणि प्रशासनाचीही डोकेदुखी वाढविणारे होते, त्यात आता सुसूत्रता येणार आहे.

दुसऱ्या महिन्याची सात तारखेची मुभा रद्द

समजा, लाभार्थ्याला त्या महिन्यात धान्य घेणे शक्य झाले नाही तर पुढील महिन्याच्या सात तारखेपर्यंत त्याला धान्य उचलता येत होते; परंतु आता ही मुभा रद्द करण्यात आली आहे. आता त्याच महिन्यात धान्य घेतले नाही तर पुढील महिन्यात ते मिळणार नाही ,महिन्यातच घ्यावा लाभ

या निर्णयामुळे धान्याचा हिशेब ठेवणे सोपे होणार आहेच; शिवाय राहिलेल्या धान्याचा संभाव्य काळाबाजार होण्याची शक्यता कमी • होणार असल्याने पारदर्शकता येणार आहे. लाभार्थ्यांनी त्या-त्या महिन्यातच जाऊन धान्य घेण्याचे आवाहन प्रशासनाकडन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात १३ लाख रेशनकार्डधारक

जिल्ह्यात एकूण रेशनकार्डधा- रकांची संख्या १३,३५५ इतकी आहे. त्यामध्ये अंत्योदयचे १७५६१८ इतके कार्डधारक आहे.

■ प्राधान्यक्रम कार्डधारकांची संख्या ६४६६५० इतकी आहे.

Comments are closed.