Last Updated on April 26, 2023 by Jyoti S.
RBI Bank
RBI बँक(RBI Bank) : देशातील सर्वात मोठी बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पुन्हा एकदा मोठी कारवाई करत 4 सहकारी बँकांना 44 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,आता विविध नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आता सर्व आरबीआयने हा दंड ठोठावलेला आहे. मात्र, यामुळे या बँकांच्या ग्राहकांच्या व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही.
तामिळनाडू स्टेट एपेक्स को-ऑपरेटिव्ह बँक, बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक, जनता को-ऑपरेटिव्ह बँक आणि बरण नागरीक को-ऑपरेटिव्ह बँक या बँकांना दंड ठोठावण्यात आला आहे, असे आरबीआयने म्हटले आहे.यापैकी सर्वाधिक 16 लाख रुपयांचा दंड चेन्नई तामिळनाडू हे एक स्टेट एपेक्स को-ऑपरेटिव्ह बँके हिला ठोठावण्यात आलेला आहे.
आरबीआयने दंड का ठोठावला?
बॉम्बे मर्कंटाइल कोऑपरेटिव्ह बँकेला(RBI Bank) १३ लाख रुपये आणि चेन्नईस्थित तामिळनाडू स्टेट एपेक्स कोऑपरेटिव्ह बँकेला १६ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, असे आरबीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
हेही वाचा: SBI Insurance : तुमचे SBI मध्ये खाते असल्यास, 342 रुपये गुंतवा आणि 4 लाखांपर्यंतचे फायदे मिळवा.
आरबीआयच्या म्हणण्यानुसार, या दोन्ही बँका निर्धारित वेळेत निर्दिष्ट रक्कम ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी (DEAF) मध्ये हस्तांतरित करण्यात अयशस्वी झाल्या, म्हणून त्यांच्यावर दंड आकारण्यात आला.
पुण्यातील जनता सहकारी बँकेला ‘ठेवीवरील व्याजदर’ या निर्देशाचे पालन न केल्याबद्दल 13 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, असे बँकेने आणखी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
Comments 2