RBI Fact Check : RBIची २ बँकांवर कठोर कारवाई, महाराष्ट्रातील या बँकेचा समावेश,ठेवीदारांच्या पैशांच आता काय होणार? यात तुमची तर बँक नाही ना पहा.

Last Updated on July 12, 2023 by Jyoti Shinde

RBI Fact Check 

थोडं पण महत्वाचं

RBI Fact Check भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा दोन बँकांवर कडक कारवाई करत त्यांचे परवाने रद्द केले आहेत.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


RBI ने आता दोन बँकांवर कडक कारवाई करत रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा त्यांचे परवाने रद्द केलेले आहेत. यामध्ये कर्नाटकातील तुमकूर येथील श्री शारदा महिला सहकारी बँक आणि महाराष्ट्रातील सातारा येथील हरिहरेश्वर बँकेचा समावेश आहे. या दोन बँकांकडे पुरेसा निधी आणि कमाईची क्षमता शिल्लक असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. हरिहरेश्वर सहकारी बँकेच्या बाबतीत, बंद करण्याचा आदेश 11 जुलै 2023 पासून लागू करण्यात आला आहे.

बँकेच्या सुमारे 99.96 टक्के ठेवीदारांना ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनद्वारे एकूण ठेव रक्कम दिली जाईल. दुसरीकडे, श्री शारदा महिला सहकारी बँकेच्या सुमारे 97.82 टक्के ठेवीदारांना त्यांची DICGC मध्ये जमा केलेली संपूर्ण रक्कम परत केली जाईल. प्रत्येक ठेवीदाराला त्याच्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी DICGC कडून विमा दाव्याद्वारे वसूल करण्याचा अधिकार असेल.

हेही वाचा: Crop loan list : एकनाथ शिंदे यांचा सर्वात मोठा निर्णय, 50 हजार रूपये आले का यादीत लगेच नाव पहा

परवाना रद्द केल्यानंतर या बँकांमध्ये बँकेशी संबंधित व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये, इतर गोष्टींसह, ठेवी स्वीकारणे आणि परत करणे ह्या गोष्टी समाविष्ट आहे. आरबीआयने असे म्हटले आहे की,आता दोन्ही सहकारी बँकांकडे पुरेशा ठेवी आणि कमाईची क्षमता अजिबात शिल्लक राहिलेली नाही. दोन्ही बँकांची सध्याची आर्थिक स्थिती पाहता या बँका ठेवीदारांना पूर्ण देयके देऊ शकत नाहीत.

हेही वाचा: Bank loan waiver : राज्यातील ३४ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी! बघा तुम्हाला लगेच माफ केले जाईल का?

काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून कार्यरत असलेल्या दोन सहकारी बँकांचा परवाना रद्द केलेले होते ,आणि आता 5 जुलै 2023 पासून दोन्ही बँकांचे कामकाज ठप्प झाले. ज्या बँकांवर कारवाई करण्यात आली त्यात बुलढाणा येथील मलकापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि बेंगळुरू येथील सुश्रुती सौहर्दा सहकारी बँक यांचा समावेश आहे.