saving investments या सरकारी बँकेने महिलांसाठी ”सेव्हिंग स्कीम” केली सुरू;कोण अर्ज करू शकतो पहा?

Last Updated on July 15, 2023 by Jyoti Shinde

saving investments

नाशिक : महिलांना बचत करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही सरकारी योजना सुरू करण्यात आलेली आहे.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत जाणून घेण्यासाठी ?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

आता बँक ऑफ बडोदाने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) लाँच केलेले आहे. महिलांना बचत करण्यासाठी तसेच प्रोत्साहन देण्यासाठी ही सरकारी योजना सुरू करण्यात आली आहे. कॅनरा बँक आणि बँक ऑफ इंडियानंत बँक ऑफ बडोदा ही योजना सुरू करणारी आता देशातील तिसरी बँक ठरली आहे.saving investments

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये महिला आणि मुलींसाठी अल्प बचत योजना म्हणून महिला सन्मान बचत पत्राची घोषणा केली होती. त्याची सुरुवात एप्रिल 2023 पासून करण्यात आली. या बचत योजनेचे खाते पोस्ट ऑफिसमध्येच उघडले जात होते. मात्र नियमांमध्ये सुधारणा केल्यानंतर आता हे खाते बँकेतही उघडता येणार आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) मध्ये गुंतवणूक हि फ़क्त आपल्याला दोन वर्षांसाठीच करावी लागते. यामध्ये सरकार महिला गुंतवणूकदारांना वार्षिक 7.5 टक्के दराने व्याज देते. ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत आता आपल्या सर्वांसाठी दोन वर्षांच्या कालावधीसाठी वैध केलेली आहे.saving investments

हेही वाचा: GST Council 50th Meet Decisions:जीएसटी बैठकीत काय स्वस्त आणि काय महाग? ५० व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत निर्णय: औषधं, अन्न स्वस्त, तर गाड्या खरेदी महाग…

खाते कोण उघडू शकते?

बँक ऑफ बडोदा महिला ग्राहकांना आणि बँकेच्या गैर-ग्राहकांना महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना खाते उघडण्याची परवानगी देते. यामध्ये महिला स्वतःच्या वतीने किंवा अल्पवयीन मुलीच्या वतीने आपले खाते उघडू शकतात.

काय नियम आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खाते खातेधारकाचा मृत्यू झाल्यास मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते. गंभीर आजाराच्या बाबतीत खाते अकाली बंद करणे इ. खाते लवकर बंद झाल्यास, मूळ रकमेवर योजनेच्या 7.5 टक्के प्रमाणित दराने व्याज देय असेल. saving investments

दंड किती?

महिला सन्मान बचत योजना खाते उघडण्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर, ग्राहक 2 टक्के दंड भरून खाते बंद करण्याची विनंती करू शकतो. अशा प्रकरणांमध्ये, मूळ रकमेवर 5.5 टक्के व्याज भरावे लागेल. तर MSSC योजनेत, खाते उघडण्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर, खातेदार पात्र शिल्लक रकमेच्या 40 टक्क्यांपर्यंत आंशिक पैसे काढू शकतो.

हेही वाचा : Unique Hotels In India भारतातील 5 अद्वितीय हॉटेल्स जे तुम्हाला परदेशाचा अनुभव देतील.