Last Updated on January 7, 2023 by Jyoti S.
Savings Account Interest: बचत खात्यावरही मिळवा ‘एफडी’ एवढे व्याज
Table of Contents
नवी दिल्ली(New Delhi): तुमच्या बचत खात्यात नेहमी अधिक प्रमाणात रक्कम राहत असेल, तर त्यावर तुम्हाला ‘ऑटो-स्वीप फॅसिलिटी’च्या माध्यमातून मुदत ठेवीएवढे (एफडी FD) व्याज मिळू शकते.
‘ऑटो-स्वीप (‘Auto-sweep)फॅसिलिटी’ला जोडलेल्या बचत खात्यावर एका मर्यादेपेक्षा जास्त रक्कम झाल्यास हे खाते ‘एफडी मध्ये रूपांतरित होते. खात्यावरील रकमेवर एफडीसारखे व्याज मिळू लागते.
रक्कम कमी झाल्यास आपोआप खाते बचत खात्यात रूपांतरित होते. अशा प्रकारे एकाच खात्यावर ग्राहकास बचत आणि एफडी अशा दोन्ही खात्यांचा लाभ घेता येतो. यासाठी मुदतीचे बंधन नसते.
हेही वाचा: New year scheme: नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच अल्पबचत गुंतवणूकदारांना सरकारकडून गिफ्ट