SBI Server Down : मोठी बातमी!! SBI चे सर्व्हर डाउन, UPI पेमेंट आणि YONO अॅप सेवा विस्कळीत, ग्राहकांना पैसे भरण्यात समस्या

Last Updated on April 4, 2023 by Jyoti S.

SBI Server Down

१ एप्रिललाही ऑनलाइन सेवांमध्ये अडचणयापूर्वी 1 एप्रिल 2023 रोजी SBI ने सर्व्हरच्या देखभालीबाबत माहिती दिली होती. त्यामुळे त्या दिवशी एसबीआयच्या सेवा बंद राहतील, असे बँकेने म्हटले होते.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

1 एप्रिललाही ऑनलाइन सेवांमध्ये खूप अडचनी आल्या

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया हेच्या नेट बँकिंगसह अनेक सेवा सोमवारी सकाळपासून बंद आहेत. अनेक वापरकर्त्यांनी सांगितले की त्यांना निधी हस्तांतरणात समस्या येत आहेत. SBI(SBI Server Down) च्या इंटरनेट बँकिंग सेवेशिवाय UPI आणि YONO अॅपशी संबंधित सेवा काम करत नसल्याच्या तक्रारीही येत आहेत.अनेक ग्राहकांनी आता SBI सर्व्हर डाऊन असल्याच्या तक्रारी देखील केल्या आहेत. अनेक ग्राहकांनी नोंदवले आहे की त्यांच्या क्रेडिट कार्ड पेमेंटवर प्रक्रिया केली जात नाही.

हेही वाचा: UPI Transaction update :  UPI पेमेंट्सबाबत मोठी बातमी ! 1 एप्रिलपासून रु. 2000 पेक्षा जास्त रकमेवर लागणार चार्ज; पहा नवीन नियम

SBI बँकेच्या वेबसाइटवर ‘बँकेच्या सर्व्हरमध्ये काहीतरी चूक झाली आहे त्यामुळे तिथे ‘something went wrong at the bank servers. Please Retry again. कृपया पुन्हा प्रयत्न करा’ संदेश येतो आहे . जागतिक स्तरावर बँक सर्व्हरच्या समस्यांचा मागोवा घेणारी वेबसाइट डाउन डिटेक्टरने देखील SBI च्या सेवांना येणाऱ्या समस्यांबद्दल ट्विट केले आहे.

SBI चे पेमेंट गेटवे 32 तास प्रभावित झाले.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका वापरकर्त्याने ट्विट करत असे म्हंटले कि एसबीआयचा संपूर्ण पेमेंट गेटवे गेल्या 32 तासांपासून काम करत नाही. दरम्यान, बँकेने गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत आणि पुन्हा प्रयत्न करण्यास सांगितले आहे आणि समस्या कायम राहिल्यास आम्हाला कळवा.

हेही वाचा: New rules for LPG gas cylinders : गॅस सिलिंडर धारकांसाठी आनंदाची बातमी, 25 मार्चपासून लागू होणार नवीन नियम

Comments are closed.