Last Updated on April 18, 2023 by Jyoti S.
School fee free : ऑनलाइन नोंदणीसाठी १७ मार्चपर्यंत मुदत
थोडं पण महत्वाचं
School fee free : गोरगरिबांच्या मुलांनाही नामांकित खाजगी शाळांतून दर्जेदार शिक्षण घेता यावे, यासाठी २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. यासाठी पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागते. नोंदणीसाठी १ ते १७ मार्च एवढा कालावधी निश्चित करून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील ११० शाळांमध्ये साधारणपणे १ हजाराच्या आसपास जागा उपलब्ध आहेत.
अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील पालकांच्या बालकांना स्वयंअर्थसहायित, खाजगी, विनाअनुदानित व खाजगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये मोफत २५ टक्के प्रवेश दिला जातो. शिक्ष विभागाकडून यापूर्वीच प्रवे प्रक्रियेच्या अनुषंगाने पूर्वतयारी केल आहे.
हेही वाचा: | कोरोनातील मयताना मिळणार कर्जमाफी राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
Comments 1