Last Updated on December 14, 2022 by Taluka Post
सरकारी (Government)कर्मचाऱ्यांना धक्का, थकीत महागाई भत्त्याबाबत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण..?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
केंद्रीय सरकारी(Government) कर्मचाऱ्यांचा कोरोना काळातील 18 महिन्यांचा महागाई भत्ता थकला आहे. कर्मचारी संघटनांकडून वारंवार मागणी करुनही केद्र सरकार थकीत महागाई भत्ता देण्यास टाळाटाळ करीत आहे.दीर्घ काळापासून थकीत असलेल्या 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याचा प्रश्न संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आला होता. त्यावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्टीकरण दिलं.
केंद्र सरकारचे स्पष्टीकरण
ते म्हणाले, की कोरोनामुळे अर्थ व्यवस्थेवर परिणाम झाला. तसेच कल्याणकारी उपाययोजनांवर खर्च करावा लागला. 2020-21 या आर्थिक वर्षानंतरही ही परिस्थिती कायम राहिल्याने सरकारने थकीत डीए व पेन्शनधारकांना महागाई सवलत देणे योग्य मानले नाही.
सरकारच्या या उत्तराने केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे. शिवाय, आता हा थकीत महागाई भत्ता कधी देणार, याबाबतही सरकारने स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे महागाई भत्त्याची थकबाकी मिळणार की नाही, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे.
हेही वाचा: Beauty: लिंबू आपल्या सौंदर्य दिनचर्यामध्ये आवश्यक का आहे याची 6 कारणे