Last Updated on December 17, 2022 by Jyoti S.
Paytm : पेटीएमची अशी एक भन्नाट ऑफर, ‘असा’ मिळवा 2 हजार रुपयांपर्यंत फायदा..
पेटीएमने नुकतीच खास ऑफर आपल्या युजर्ससाठी आणली आहे. या ऑफरने युजर्स आता जवळपास 2 हजार रुपयांपर्यंतचा फायदा घेऊ शकणार आहेत. यासाठी तुमच्याकडे आता फक्त पेटीएम ॲप असणे गरजेचे असून त्यावरून तुम्हाला आता ऑनलाईन वीज बिल भरणे गरजेचे आहे.
पेटीएमने(Paytm) नुकतीच ‘बिजली डेज’ ऑफरची मोठी घोषणा केली आहे. ज्यामुळे ग्राहकांना आकर्षक कॅशबॅक मिळणार आहे. आता ग्राहकांनी जर पेटीएमवरून वीज बिल भरणा केला तर त्यांना लगेच आता 100 टक्के कॅशबॅक मिळणार आहे.
तसेच प्रत्येक महिन्याच्या 10 ते 15 तारखेच्या दरम्यान दररोज 50 युजर्सना 2 हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळेल. याशिवाय, युजर्सना टॉप, शॉपिंग आणि ट्रॅव्हल ब्रँडचे डिस्काउंट व्हाउचर देखील दिले जाणार आहेत. फक्त दर महिन्याच्या 10 ते 15 तारखेदरम्यानच या ऑफरचा फायदा घेता येणार आहे.
पेटीएम(Paytm) अॅपच्या माध्यमातून पहिल्यांदाच वीज बील भरणाऱ्या युजर्सना 200 रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जात आहे. यासाठी पेटीएम युजर्सना ELECNEW200 हा प्रोमो कोड वीज बिल भरताना वापरावा लागणार आहे. पेमेंट करण्यासाठी तुम्ही पेटीएम यूपीआय, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, पेटीएम वॉलेट, क्रेडिट कार्ड वापरू शकता. हे पेमेंट पूर्ण झाल्यावर, तुम्ही त्या पेमेंटची पावती डाउनलोड करून ठेवू शकता. हेही वाचा: सरकारी (Government)कर्मचाऱ्यांना धक्का, थकीत महागाई भत्त्याबाबत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण..
वीज बिल कसे भराल..?

पेटीएम(Paytm) ॲपमध्ये ‘Recharges and Bill Payments’ वर जा आणि ‘Electricity’ सिलेक्ट करा. आपले राज्य, वीज कंपनी व सब डिव्हिजन निवडा, यानंतर तुमचा वीज बिलावर लिहिलेला ग्राहक ओळख क्रमांक टाका. आता ‘Proceed’ वर क्लिक करा. पेटीएम आता तुम्हाला बिलाची रक्कम दाखवेल. यानंतर पैसे भरा. पैसे भरल्याचे कन्फर्मेशन तुम्हाला मेसेजद्वारे/ॲपमध्ये समजेल.