Tuesday, February 27

super cow : एका दिवसात 140 लिटर दूध देणारी ही गाय ,पुढील 2 वर्षांत अशा 1 हजार गायींची निर्मिती करण्याची तयारी सुरु.

Last Updated on February 9, 2023 by Jyoti S.

super cow : क्लोनिंगच्या माध्यमातून चीनने बनवली सुपर गाय

चीन विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सतत विचित्र प्रयोग करत आहे. चीन विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सतत विचित्र प्रयोग करत आहे. अलीकडेच आता चिनी शास्त्रज्ञांनी क्लोनिंगद्वारे हे तीन ‘सुपर गाय’ तयार केल्याचा दावा केलेला आहे. या गायी(super cow) त्यांच्या संपूर्ण आयुष्यात 100 टन म्हणजेच 2 लाख 83 हजार लिटर दूध देऊ शकतात. या गायी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात 100 टन म्हणजेच 2 लाख 83 हजार लिटर दूध देऊ शकतात.

आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिन्ही गायींचे प्रजनन नॉर्थवेस्ट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केले आहे. निंग्झिया परिसरात गेल्या दोन महिन्यांपूर्वी या बछड्यांचा जन्म झाला. हे सर्व नेदरलँडमधून आलेल्या होल्स्टेन फ्रिशियन गायीचे क्लोन आहेत.

प्रथम जाणून घ्या, क्लोनिंग म्हणजे काय?


क्लोनिंग(Cloning) म्हणजे एका जीवातून दुसऱ्या जीवात अलैंगिक पद्धतीने जीव तयार करण्याची प्रक्रिया. सोप्या भाषेत, शास्त्रज्ञ प्राण्याचा डीएनए घेतात आणि त्याच्या मदतीने प्राण्याचा नमुना तयार करतात. शास्त्रज्ञ त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या जनुकांमध्ये बदल करतात, ज्यामुळे सामान्य प्राण्यांपेक्षा अधिक शक्तिशाली प्राणी बनवता येतात.

इथे पहा व्हिडिओ

चीनने गायीचे क्लोन कसे केले?

प्रोजेक्ट लीड जिन यापिंग यांनी सांगितले की, सर्वप्रथम चांगल्या जातीच्या गायींच्या कानाच्या पेशी (peshi) काढण्यात आल्या. त्यानंतर यापासून भ्रूण तयार करून 120 गायींमध्ये रोपण करण्यात आले. यातील 42% गायी गाभण झाल्या. सध्या तीन सुपर गायींचा जन्म झाला आहे, तर येत्या काही दिवसांत 17.5% वासरांचा जन्म होऊ शकतो.

एक सुपर गाय दरवर्षी 18 टन दूध देते


शास्त्रज्ञांच्या मते, एक सुपर गाय(super cow) एका वर्षात 18 टन (16.3 हजार लिटर) दूध देण्यास सक्षम आहे. हे अमेरिकेतील सामान्य गायीनपेक्षा 1.7 पटीने  जास्तच  आहे.येत्या २-३ वर्षांत चीनमध्ये एक हजार सुपर गायींचे उत्पादन होईल, असे यापिंग सांगतात. याचा सर्वाधिक फायदा डेअरी उद्योगाला होणार आहे. सध्या, चीनमध्ये प्रत्येक 10,000 गायींपैकी फक्त 5 गायी त्यांच्या आयुष्यात 100 टन दूध देऊ शकतात. याशिवाय देशातील ७० टक्के दुभत्या गायी आयात केल्या जातात.

हेसुद्धा वाचलात का? सरकारचा मोठा निर्णय पेट्रोल डिझेलच्या दरात झाले मोठे बदल

चीनमध्ये प्राण्यांचे क्लोनिंग वाढत आहे

चीनने प्राण्याचे क्लोन बनवण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी, चिनी शास्त्रज्ञांनी जगातील पहिला क्लोन केलेला आर्क्टिक लांडगा तयार केला. 2017 मध्ये, चीनने गुरांचे क्लोन केले जे प्राण्यांमधील क्षयरोगाचा पराभव करू शकतात. अमेरिकेसह अनेक विकसित देशांमध्येही या तंत्रज्ञानावर काम सुरू आहे.

इथे पहा व्हिडिओ