Last Updated on December 20, 2022 by Jyoti S.
Twitter : ट्विटरला टक्कर देणार ‘हे’ अॅप, कमावता येणार पैसे..
Twitter: एलॉन मस्कने ट्विटर खरेदी करण्यासाठी मोठा व्यवहार केला आणि लगेचच ट्विटरमध्ये अनेक महत्वपूर्ण बदल देखील केले. ट्विटरने अनेक नवीन फीचर्स आणत आता यूजर्सकडून काही फिचर्ससाठी पैसे घेण्याचेही ठरविले आहे. आता ट्विटरमधून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांनी आता एलॉन मस्कला टक्कर देण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्विटरला(Twitter) नवीन चॅलेंज..?
काही दिवसांपूर्वीच ट्विटर खरेदी करण्यासाठीचा करार करण्यात आल्यापासून एलॉन मस्ककडून अनेक कर्मचाऱ्यांची कपात केली गेली. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात नाराजी पसरली. पण इतर गोष्टी पाहता मस्क मागील काही दिवसांत विचित्र निर्णयांमुळेही सतत चर्चेत राहिले आहेत.हेही वाचा: Whatsapp: आता होणार नवीन वर्षात व्हॉट्स अॅपमध्ये मोठे बदल,युजर्सला मिळणार आता अनेक सुविधा…
ट्विटर खरेदी केल्यानंतर मस्क यांनी केलेल्या नोकरकपातीनंतर आता काही कर्मचारी नवीन ॲप लाँच करणार आहे जे ट्विटरशी स्पर्धा करेल. कंपनीमधील अनेक नियमही मस्क यांनी बदलले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली. आता ट्विटरमधून काढलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी त्यांचं स्वतःचं एक अॅप डेव्हलप केलंय, जे जानेवारी 2023 मध्ये लाँच होणार आहे.
▪️ स्पिल नावाचं हे अॅप म्हणजे एक नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणार आहे. जे यूजर्सना कमाई करून देईल.
▪️ जानेवारीमध्ये अॅप लाँच होणार असून लोकप्रिय पोस्ट्सद्वारे या अॅपमध्ये पैसे कमावता येतील. युजर्स कमाईही करू शकतील. स्पिल हे नवीन अॅप रिअल टाइम कॉन्व्हर्सेशनल प्लॅटफॉर्म आहे.
▪️ अॅपमध्ये ‘टी पार्टीज’ नावाचं फिचर असणार आहे. त्याद्वारे युजर्सना ऑनलाईन किंवा वास्तविक जीवनात कनेक्ट केलं जाईल. क्रिएटर्सना क्रेडीट देण्यासाठी आणि पैसे मिळवून देण्यासाठी केलेला आहे.
▪️ समजा जर एखाद्या युजर्सचे एखादे स्पिल व्हायरल झाले तर ते मॉनेटाइज करता येऊ शकेल म्हणजेच युजर्सना पैसे कमावता येईल.