
Last Updated on October 17, 2023 by Jyoti Shinde
Trigger to of crop insurance
ट्रिगर-टू लागू झाल्याने शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट
नाशिक : सिन्नर तालुक्यासह अनेक तालुक्यांना पावसाने दांडी मारल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक तसेच मानसिक फटका बसलेला आहे. यासाठीच आता शासनाने नुकताच ट्रिगर-टू लागू करून राज्यातील ४३ तालुके दुष्काळी ठरविलेले आहे. त्यात मालेगाव तालुक्याचा समावेश आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हेक्टरी साडेआठ ते साडेबावीस हजार नुकसानभरपाई मिळू शकते.
यंदा पावसाळ्यात सरासरीपेक्षाही खूपच कमी पाऊस झालेला आहे.यामध्ये तीन पेक्षा अधिक आठवड्याचा खंड, पाण्याचा पातळीत मध्ये घट, तसेच अपेक्षित उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षाहि मोठ्या प्रमाणात झालेली घट, चाऱ्याचा प्रश्न सुद्धा गंभीर झालेला आहे, तसेच पाणीटंचाई अशा सर्व बाबींचा विचार करून दुष्काळासंदर्भातील ट्रिगर-टू लागू करण्यात आलेली आहे. Trigger to of crop insurance
थोडं पण महत्वाचं
यात मालेगावसह अनेक तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसानभरपाई घेणारा तालुका ठरणार आहे. याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना बैंक खात्यावर नुकसानभरपाईची रक्कम मिळू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट मिळू शकते. यंदा पावसाने तब्बल अडीच महिने मालेगाव तालुक्यात पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांची पिके करपून नुकसान झाले आहे.Trigger to of crop insurance
■ अशा शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावीयासाठी मालेगाव तालुका महसूल मंडळाकडून पिकांचे पंचनामे करण्यात आले होते. पंचनामा केल्याचा अहवालानुसार लवकरच शेतकऱ्यांना २५ टक्के रक्कम नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

या पिकांची नुकसानभरपाई
कापूस, मका, ज्वारीबाजरी, भुईमूग, मूग, कांदा पिकांना नुकसान भरपाई मिळू शकते.
नदत
अशा तालुक्याचा समावेश
उल्हासनगर, शिंदखेडा, नंदुरबार, मालेगाव, सिन्नर, येवला, बारामती, दौंड, इंदापूर, मुळशी पौंड, पुरंदर-सासवड, शिरुर-घोडनदी व वेल्हे, बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस व सांगोला (सोलापूर)अंबड, बदनापूर, भोकरदनजालना व मंठा, कडेगाव, खानापूर विटा, मीरज, शिराळा ₹ (सांगली)खंडाळा व वार्ड, हातकणंगले व गडहिंग्लज, छत्रपती संभाजीनगर व सोयगाव, आंबेजोगाई, धारुर व वडवणी, रेणापूर, लोहारा, धाराशिव व वाशी, बुलढाणा व लोणार या तालुक्याचा समावेश आहे.Trigger to of crop insurance
