Last Updated on March 4, 2023 by Jyoti S.
Wedding news
थोडं पण महत्वाचं
Wedding news : शेतकरी विवाह भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे शेती आणि शेतीशी संबंधित उद्योगांवर आधारित आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारकडून नेहमीच विविध योजना सुरू केल्या जातात. काही सामाजिक संस्थाही शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. असाच एक अभिनव उपक्रम एका सामाजिक संस्थेने राबविला असून या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मुला-मुलींची एक रुपयात लग्न लावण्यात येणार आहे.
आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.
या उपक्रमातून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. शेतकरी वधू-वरांसाठी हा निश्चितच आनंदाचा प्रसंग असेल आणि शेतकऱ्यांच्या मुलाचे आणि कष्टकरी शेतमजुरांच्या लग्नाला आर्थिक अडचणींमुळे उशीर होणार नाही. या उपक्रमाबाबत अधिक माहिती अशी की, भंडारा बीटीबी सब्जी मंडी परिवारामार्फत शेतकरी, शेतमजूर कुटुंबातील वधू-वरांचे सामूहिक विवाह कार्यक्रम आयोजित केले जातात.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या(Wedding news) मुला-मुलींचे लग्न केवळ एक रुपयात होणार आहे. ही नोंदणी सुरू असून मीडिया रिपोर्टनुसार आतापर्यंत सहा जोडप्यांची नोंदणी झाली आहे. वास्तविक, बीटीबी सब्जी मंडी नेहमीच शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवते. कोरोनाच्या काळातही या संस्थेने आर्थिक पाठबळ देऊन आपली सामाजिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.
हेही वाचा: काय म्हणता! महाराष्ट्र सरकारही देतेय लग्नासाठी अनुदान? आता येथे अर्ज करा
यासोबतच शेतकऱ्यांनी(Wedding news) उत्पादित केलेला भाजीपाला या संस्थेच्या माध्यमातून परदेशी बाजारपेठेत नेण्यात आला आहे. निश्चितच या संस्थेने भंडारा जिल्ह्याचे नाव उंचावण्यात आणि शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. एवढेच नव्हे तर गरीब शेतकरी, शेतमजूर, भाजी विक्रेत्यांच्या मुला-मुलींचे लग्न लावून देण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या संस्थेने राबवलेला हा अभिनव उपक्रम महाराष्ट्राच्याच संस्कृतीचे दर्शन घडवत आहे.
हेही वाचा: salman khan marriage : अखेर आता सलमान खान चढणार बोहल्यावर…या अभिनेत्रीसोबत तो बांधणार लग्नगाठ?
वधू-वरांच्या सामूहिक विवाह सोहळ्यात गरजू शेतकरी, शेतमजूर, भाजी विक्रेते यांची नोंदणी करण्याचे आव्हानही संस्थेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. नोंदणी करताना शाळा सोडल्याचा दाखला, स्वतःचे आधारकार्ड, पालकांचे आधारकार्ड, चार पासपोर्ट आकाराचे फोटो, पालकांचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, कायमस्वरूपी पत्त्याचा पुरावा अशी कागदपत्रे पूर्ण करावी लागतात. निश्चितच बीटीबी संस्थेने सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.