Last Updated on December 20, 2022 by Jyoti S.
Loan : कर्ज मिळणार की नाही, हे नेमके कशावरून ठरते?
५ गोष्टी लक्षात ठेवा; सिबिल स्कोअर करा चांगला
दिल्ली : तुम्हाला जर कोणत्याही प्रकारचे कर्ज(Loan) घ्यायचे असल्यास बँका आणि वित्तीय संस्था पहिले तुमचा सिबिल स्कोअर तपासून घेतात. जर तुमचा स्कोअर कमी असेल, तर कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात. प्रसंगी कर्ज नाकारलेही जाऊ शकते. वित्तीय क्षेत्रामध्ये नोकरी करण्यासाठी सुद्धा आता सिबिल स्कोअर चांगला असणे आवश्यक आहे. कारण अनेक कंपन्या उमेदवाराचा सिबिल स्कोअर तपासतात.चला तर मग आता आपला सिबिल स्कोअर चांगला कसा ठेवावा, याची माहिती घेऊ या.
सिबिल स्कोअर ३०० ते ९००च्या आतला आकडा असतो. सिबिलच्या रिपोर्टमध्ये एखाद्याची संपूर्ण आर्थिक कुंडलीच असते. तुमच्या सगळ्या आर्थिक व्यवहारांचा पूर्ण इतिहास त्यातच असतो.
किमान एकदा कर्ज घेणे आवश्यक १८ ते ३६ महिन्यांत सिबिल स्कोअर तयार होतो. हेही वाचा: Farmers loan : मुदतीत कर्जफेड करणाऱ्यांना आठवडाभरात ५० हजार
काय सांगतो सिबिल स्कोर?
सिबिल स्कोर ६५० च्या वर असल्यास बँका कर्ज देण्यास तयार होतात.

सिबिल म्हणजे काय?
सिबिल हे ‘क्रेडिट इंफॉर्मेशन ब्यूरो इंडिया लिमिटेडचे लघुरूप आहे.ही रिझव्ह बँकेला माहिती देणाऱ्या कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. याशिवाय आता भारतात चिफैक्स एक्सपेरियन आणि सीएफआय हायमार्क या कंपन्या सुद्धा क्रेडिटबाबत माहिती देतात.
सिबिल स्कोअर हे आवश्यक
वेळेत भरातुम्ही तुमचे ईएमआय कर्ज(Loan) घेतले असल्यास त्याचे हप्ते (ईएमआय) नियमितपनाने भरा.
क्रेडिट कार्ड वापरताना आता घ्या काळजी : क्रेडिट कार्डाचे बिल वेळेवर भरले नाही, तर सिबिल स्कोअर सुद्धा कमी होतो. त्यामुळे तुम्ही क्रेडिट कार्ड वापरताना अत्यंत काळजी घ्या तसेच वेळेवर बिलपण भरा .
तुम्हाला झेपेल तेवढेच कर्ज घ्या आवाक्या बाहेर जाऊन जास्तीचे कर्ज घेऊन हप्ते वाढवू नका.
वारंवार सिबिल स्कोअर तपासू नका मोबाइल अॅपद्वारे आता । सिबिल स्कोअर पाहता येतो, पण वारंवार सिबिल स्कोअर तपासू नका. कारण त्यामुळे सिबिल स्कोअर कमी होतो.
सामाईक खात्यापासून सावध राहा: आणि तुम्ही तुमचे सामाईक खाते (जॉइंट अकाउंट) उघडण्याचे टाळा. कारण आता तुमच्या सहकाऱ्याने कर्ज घेऊन ते थकविले तर तुमचा सिबिल स्कोअरही बाधित होऊ शकतो. याशिवाय कर्जाला जामीन राहताना काळजी घ्या. कारण थकीत कर्जाच्या जामीनदाराचा सिबिलही खराब होतो.