Last Updated on December 17, 2022 by Jyoti S.
Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेल पुन्हा स्वस्त होणार? मोदी सरकारचा मोठा निर्णय..
गेल्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव हे सातत्याने कमीच होत आहेत. मात्र, त्यानंतरही भारतात पेट्रोल-डिझेलचे(Petrol-Diesel) दर गेल्या अनेक दिवसांपासून कमी झालेले नाहीत ते वाढतच होते. मात्र, आता लवकरच इंधनाच्या दरात मोठी कपात होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. त्यासाठी आता मोदी सरकारने नुकताच मोठा निर्णय सुद्धा घेतलेला आहे.
विंडफॉल टॅक्समध्ये मोठी कपात
Petrol-Diesel : मोदी सरकारने आता डिझेल(Diesel ) आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएलवर (एटीएफ) लावलेला विंडफॉल टॅक्स कमी केलेला आहे. भारतीय तेल कंपन्यांच्या कच्च्या तेलावरील कर हा आधी 4900 रुपये प्रति टन होता मात्र आता 1700 रुपये प्रति टन इतका कमी करण्यात आलाय.
तसेच, आता ‘एटीएफ’वरील प्रति लिटर 5 रुपये विंडफॉल टॅक्स आता 1.5 रुपये देखील करण्यात आलाय. पेट्रोलवर(Petrol) टॅक्स झिरो विंडफॉल लागतो. तो त्यांनी तसाच ठेवलाय. फक्त हायस्पीड डिझेलवरील 8 रुपयेचा विंडफॉल टॅक्स 5 रुपये करण्यात आलेला आहे.हेही वाचा : Government Schema Gold: स्वस्तात सोने खरेदीची पुन्हा संधी, मोदी सरकारच्या ‘या’ योजनेचा…!!
विंडफॉल टॅक्स विशेष परिस्थितीत लावला जातो. एखाद्या क्षेत्राला किंवा कंपनीला कमी कष्टामध्ये भरपूर नफा झाला आहे , तरच हा कर देखील लावला जातो. आणि सरकारकडून त्याची दर 15 दिवसांनी फेरतपासणी देखील केली जाते. त्याच आधारावर हा कर कमी-जास्त केला जातो. रशिया-युक्रेन युद्धामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सुद्धा वाढल्या आहेत.
मार्च महिन्यात या किमती 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्याने त्याचा भारतीय तेल कंपन्यांना मोठा फायदा झाला आहे . मात्र देशांतर्गत तेल उत्पादक कंपन्यांना मिळालेल्या फायद्याचा सरकारला लाभ करून घेण्यासाठी केंद्र सरकारने आता 1 जुलै रोजी ‘एटीएफ’वर 6 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवर 13 रुपये प्रति लिटर विंडफॉल टॅक्स लावलेला होता. मात्र, आता मोदी सरकारने त्यात कपात केल्याने पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.