Zilla Parishad महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी! आता जिल्हा परिषद शाळेत कंत्राटी शिक्षक! इतके पगार मिळणार.

Last Updated on July 12, 2023 by Jyoti Shinde

Zilla Parishad

नाशिक : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये गेल्या बारा वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांची भरती झालेली नाही. अशा स्थितीत 18 हजार जागा रिक्त आहेत.

प्राथमिक शिक्षकांच्या या कमतरतेवर मात करण्यासाठी राज्य सरकारने आता तात्पुरत्या स्वरूपात सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील सरकारी अध्यादेश आता नुकताच जारी करण्यात आलेला आहे.या निर्णयानुसार येत्या पंधरवड्यात राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची भरती करून त्यांना 500 रुपये मानधन देण्यात येणार आहे. याशिवाय अन्य कोणताही लाभ मिळणार नाही. Zilla Parishad

दरम्यान, शासनाच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषदांसमोर निधीचा प्रश्न निर्माण झाल्याचे वृत्त आहे. जिल्हा परिषद हे मानधन कुठून देणार, याबाबत शासनाकडून मार्गदर्शनाची प्रतीक्षा असल्याचे बोलले जात आहे.

सेवानिवृत्त शिक्षकांच्या भरतीसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्षे आहे. जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या इच्छुक शिक्षकांकडून अर्ज मागवणार आहेत. कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीसाठी शिक्षण प्राधिकरणाशी करार करावा लागेल. नियमित शिक्षक मिळेपर्यंतच ही नियुक्ती केली जाईल, असे शासनाने परिपत्रकाद्वारे सांगितले आहे.Zilla Parishad

राज्यातील शिक्षकांची संख्या

राज्यात 2011 पासून शिक्षक भरतीवर बंदी आहे. 2019 मध्ये ती मागे घेण्यात आली असली तरी अद्याप शिक्षक भरती सुरू झालेली नाही. सध्या राज्यातील सर्व खाजगी व अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या ६१ हजार जागा रिक्त आहेत. एकट्या जिल्हा परिषद शाळांमध्ये 18 हजार 46 जागा रिक्त आहेत. विहित शिक्षक भरतीबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे भरतीला विलंब होत असल्याचे सांगण्यात येत आहे.Zilla Parishad