Annasaheb Patil Economic Development Corporation: उद्योगासाठी ५० लाखांपर्यंत कर्ज; शासन भरणार व्याज

Last Updated on October 10, 2023 by Jyoti Shinde

Annasaheb Patil Economic Development Corporation

नाशिक : राज्यातील मराठा समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. मराठा समाजातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, त्यांना व्यवसायात उभारी घेता यावी, उद्योग क्षेत्रात राज्याचा विकास व्हावा यासाठी अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली.

विविध व्यवसायांसाठी दहा लाखांपासून ५० लाखांपर्यंत कर्ज दिले जातेत्याचे व्याज शासन भरते. शेकडो तरुणांनी योजनेचा लाभ घेतला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली. तेव्हापासून नाशिक जिल्ह्यात कर्ज योजनेसाठी एकूण १०० तरुणांनी पोर्टल नोंदणी केली आहे. त्यापैकी २५ जणांना कर्ज वाटप झाले आहे.

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील व्यक्तींना दहा लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर केले जाते. लाभार्थ्याने कर्जाचे हप्ते वेळेत भरल्यास हप्त्याच्या व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात डीबीटीच्या साह्याने जमा करण्यात प्रमाणित संस्थ येते. योजनेंतर्गत दिव्यांगांसाठी चार टक्के निधी राखीव ठेवण्यात येतो.Annasaheb Patil Economic Development Corporation

गट प्रकल्प

गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत दहा लाख ते पन्नास लाखांपर्यंत कर्ज देण्यात येते व कर्जाचा परतफेड कालावधी पाच वर्षांसाठी असतो. यात मागास घटकातील उमेदवारांचे बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था कंपनी, एलपीपी अशा शासन प्रमाणित संस्थांना बँकेतर्फे स्वयंरोजगार, उद्योग उभारण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते.

हेही वाचा: The 5 Best Fruits For Weight Loss:पोटाची चरबी कमी करायची आहे, पण व्यायाम करायचा नाहीये? ही 5 फळे खा, तुमचा लठ्ठपणा होईल कमी.

येथे करा ऑनलाइन अर्ज

मराठा समाजातील इच्छुकांना उद्योगासाठी कर्ज हवे असल्यास ऑनलाइन अर्ज करू शकतात.

■ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे संकेतस्थळ डब्ल्यूडब्ल्यूडब्लु. उद्योग. महास्वयम. जीओव्ही. इन येथे जाऊन अर्ज भरता येईल. इच्छुकांनी संकेतस्थळाला भेट द्यावी.Annasaheb Patil Economic Development Corporation

नऊ महिन्यांत २५ जणांना तीन कोटींचे वाटप

जानेवारी ते सप्टेंबर नऊ महिन्यांत एकूण १०० जणांनी अर्ज केला आहे. त्यापैकी काही अर्जाची पडताळणी सुरु आहे. २५ जणांना योजनेंतर्गत तीन कोटींचे वाटप करण्यात आले आहे.

हेही वाचा: Rbi Changes Penalty Rules On Loan Accounts: आरबीआयने कर्ज खात्यांवरील दंडाचे नियम बदलले, पाहा त्याचा सर्वसामान्यांना कसा फायदा होईल


मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील उद्योजक बनू इच्छिणाऱ्या व तसेच क्षमता असलेल्या तरुणांसाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आर्थिक साह्य पुरवण्याच्या दृष्टीने अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. पात्र तरुणांनी योजनेचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा.Annasaheb Patil Economic Development Corporation