
Last Updated on February 21, 2023 by Jyoti S.
Annasaheb Patil loan yojna
थोडं पण महत्वाचं
कर्ज योजना(Annasaheb Patil loan yojna) : उद्योगासाठी 15 लाखांचे कर्ज उपलब्ध होणार असून हे कर्ज अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेंतर्गत उपलब्ध होणार आहे. अण्णासाहेब पाटील या कर्ज योजनेसाठी जास्तीत जास्त तरुणांनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आलेले आहे.
अण्णासाहेब पाटील(Annasaheb Patil loan yojna) आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत मराठा समाजातील उद्योजक किंवा तरुण, ज्यांच्यासाठी आता तिथे कोणतेही मंडळ कार्यरत नाही, तसेच त्यांना त्या उद्योगासाठी कर्ज दिले जाते. नोकऱ्या उपलब्ध नसल्यामुळे अनेक तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे पण भांडवलाअभावी ते शक्य होत नाही. अण्णा साहेब पाटील कर्ज योजनेंतर्गत घेतलेल्या कर्जाचे व्याज हे पूर्ण पने सरकार भरणार आहे. त्यामुळे आता देशांतर्गत उद्योगासाठी 15 लाखांचे कर्ज उपलब्ध होणार आहे.
या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
उद्योगासाठी 15 लाखांचे कर्ज दिले जाणार असून तरुणांना मदत केली जाणार आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज व्याज परतफेड योजना ज्या तरुणांना आपला उद्योजकीय व्यवसाय उभारायचा आहे त्यांच्यासाठी राबविण्यात येत आहे.
त्यामुळे आता तरुणांना त्यांचे उद्योजक बनण्याचे स्वप्न साकार करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून
१. वैयक्तिक कर्ज
२. गट कर्ज
३. गट प्रकल्प योजना
वरील प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. सरकारच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतफेड योजनेत आधी 10 लाखांची मर्यादा होती पण आता ती 15 लाख करण्यात आली आहे. त्यामुळे आता या योजनेतून अधिक कर्ज तरुणाना उपलब्ध होणार आहे. कर्ज योजना
वैयक्तिक कर्ज(Annasaheb Patil loan yojna) योजनेंतर्गत आता अण्णासाहेब कर्ज योजनेतून 15 लाखांचे हे सर्व पात्र तरुणांना मिळणार आहे. यापूर्वी वैयक्तिक कर्ज व्याज सवलत योजनेची मर्यादा 10 लाख रुपये होती, आता ही मर्यादा 15 लाख रुपये एवढी करण्यात आली आहे.
या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या तीन प्रमुख कर्ज योजना आहेत
१) वैयक्तिक कर्ज व्याज प्रतिपूर्ती योजना – या योजनेअंतर्गत, व्यवसाय सुरू करण्यासाठी 15 लाखांपर्यंतचे बँक कर्ज उपलब्ध करून देणार आहे.
योजनेचे निकष – या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा पुरुषांसाठी 50 वर्षे आणि महिलांसाठी 55 वर्षे अशी आहे.
२) गट कर्ज व्याज प्रतिपूर्ती योजना – या योजनेअंतर्गत दोन व्यक्तींसाठी 25 लाख, तीन व्यक्तींसाठी 35 लाख आणि 500 पेक्षा जास्त व्यक्तींसाठी 50 लाखांची कर्ज मर्यादा आहे.
योजनेचे निकष – गट कर्जासाठी दहा जणांच्या गटामध्ये मराठा समाजातील एकूण सहा तरुण असावेत.
३) गट प्रकल्प कर्ज योजना – खुल्या गटातील शेतकरी गटांसाठी सात वर्षांच्या परतफेडीसाठी 1आता त्यांना 10 लाखांपर्यंतचे कर्ज मिळणार.
योजनेचे निकष- शेतकरी गट हा मराठा समाजाचाच असला पाहिजे .
त्याच मुळे त्या तरुणांना अण्णा साहेब कर्ज योजनेचा लाभ घेता येईल
Comments are closed.