
Last Updated on October 3, 2023 by Jyoti Shinde
Bachat gat mini tractor yojna
मिनी ट्रॅक्टर्ससाठी तीन लाखांचे दिले जाते अनुदान;
जिल्ह्यात २८ बचतगटांची निउड समाज कल्याण अनुसूचित जाती, नवबौद्ध नोंदणीकृत बचतगटांना लाभ
नाशिक : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नोंदणीकृत यता बचत गटांना मिनी ट्रैक्टर आणि त्याची उपसाधने १० टक्के अनुदानावर वाटप केली जातात. Bachat gat mini tractor yojna
नाशिक जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून योजनेसाठी अर्ज दाखल केलेली सर्वच्या सर्व २८ प्रकरणे मंजूर करण्यात आली असून त्यांना प्रत्येकी ३ लाख १४ हजारांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. मिनी ट्रॅक्टर योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवगटातील लाभासाठी आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गट असणे अत्यंत आवश्यक आहे. बचत गटामधील कमीत कमी ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील अपेक्षित असून मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी शासनाकडून संबंधित लाभार्थ्यांना ३ लाख १५ हजार इतके अनुदान दिले जाते.
२८ अर्ज, २८ बचत गटांची निवड
जिल्ह्यातून या योजनेसाठी एकूण २८ बचत गटांनी अर्ज केले होते. या अर्जाची छाननी केल्यानंतर सर्वच बचत गट पात्र ठरल्याने या बचतगटांना अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
लाभार्थ्यांना दोन टप्प्यात अनुदान मंजूर केले जाते. प्रकरण मंजूर झाल्यानंतर खरेदीसाठी डीबीटी मार्फत खात्यात अनुदानाचा पहिला हप्ता जमा केला जातो आणि दुसरा हप्ता ट्रॅक्टरचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अदा केले जाते.Bachat gat mini tractor yojna
मिनी ट्रॅक्टर, उपसाधनांसाठी ९० टक्के अनुदान
अनुसूचित जाती व नवबद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी ३ लाख १५ हजार या मर्यादेत किमान ९ ते १८ अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी कमाल मर्यादेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किमतीच्या १० टक्के हिस्सा पूर्ण भरल्यानंतर प्रत्यक्ष किमतीच्या ९० टक्के अनुदान दिले जाते.Bachat gat mini tractor yojna
समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती, नवबौद्ध नोंदणीकृत बचतगटांना लाभ दिला जातो. या योजनेच्या लाभासाठी बचतगटांनी अर्ज करावा. पात्र बचतगटांना शासानच्या नियमाप्रमाणे अनुदान मंजूर केले जाते. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती, नवबौद्ध नोंदणीकृत बचतगटांनी घ्यावा.
काय आहे योजना
सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसाहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येते. ३ लाख १५ हजार इतके अनुदान दिले जाते. ९० टक्के शासकीय अनुदान व १० टक्के स्वयंसहायता बचत गटांचा हिस्सा या सूत्रानुसार योजना राबविली जाते. यासाठी बचतगट नोंदणीकृत असणे अपेक्षित आहे.Bachat gat mini tractor yojna