Last Updated on May 31, 2023 by Jyoti Shinde
cabinet Decisions 2023
थोडं पण महत्वाचं
cabinet Decisions 2023 : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे.
मुंबई : केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यातही शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठी मंजुरी देण्यात आलेली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचा मोठा फायदा १ कोटीहून अधिक नागरिकांना होणार आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्याची संपूर्ण रक्कम भरावी लागत होती, आता या नव्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत नोंदणी करण्यासाठी फक्त एक रुपये भरावे लागणार आहेत.तसेच उर्वरित रक्कम राज्य सरकार भरणार आहे.cabinet Decisions 2023
तसेच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत अर्थसंकल्पात केवळ एक रुपयाच्या पीक विमा योजनेच्या घोषणेला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झालेली होती.
मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले निर्णय
1) कामगारांची सुरक्षा, आरोग्य, कामाच्या परिस्थितीबाबत नवीन कामगार तसेच इतर नियमांना देखील मान्यता देण्यात येणार आहे . लाखो कामगारांच्या हिताचे रक्षण केले.
2) या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबाला आपले केंद्र सरकार दरवर्षी सहा हजार रुपयांचा निधी देत असते त्याच धर्तीवर आता राज्य सरकारही शेतकऱ्यांना सहा हजारांचा निधी देणार आहे.
3) बृहन्मुंबईतील क्लस्टर पुनर्विकासाला मोठी चालना मिळेल. प्रीमियमवर 50 टक्के सूट देण्याचा निर्णय
4) अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयात प्राध्यापकांच्या 105 पदे निर्माण होणार
5) नांदुरा येथील जिगाव प्रकल्पाला गती देणे. 1710 कोटींच्या अतिरिक्त खर्चास मान्यता
6) कामगारांची सुरक्षा, आरोग्य, कामाच्या परिस्थितीबाबत नवीन कामगार नियमांना मान्यता देण्यात येणार आहे लाखो कामगारांच्या हिताचे रक्षण केले.
7) एक रुपयामध्ये पीक विमा योजनेचा लाभ लाखो शेतकऱ्यांना होणार.
8) “डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान” योजनेचा विस्तार. तसेच आता आणखी तीन जिल्ह्यांमध्ये सुद्धा ही मोठी योजना राबविण्यात येणार आहे.
9) सिल्लोड तालुक्यात मका संशोधन केंद्र उभारणार. 22.18 कोटी खर्च मंजूर
10) पर्यटन व्यवसायामध्ये आता महिलांना संधी देण्यासाठी सरकार महिला केंद्रित पर्यटन धोरण राबवणार आहे
11) माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात राज्याला देशात आघाडीवर नेण्यासाठी नवीन माहिती तंत्रज्ञान सहाय्य सेवा धोरण स्वीकारणे.तसेच इथे आता 95 हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित होणार आहे
हेही वाचा:
WhatsApp technology :व्हॉट्सअॅपवर +84, +62 नंबरवरून कॉल येत आहेत, त्यामुळे सावधान, या 5 गोष्टी ताबडतोब करा नाहीतर.
हेही वाचा:
Todays weather : पावसाने केला कहर! 16 मे पर्यंत ‘या’ राज्यांमध्ये वादळासह मुसळधार पावसाचे संकेत, ‘मोचा’ चक्रीवादळाचा प्रभाव दिसेल